वापरात नसलेली दिव्यांग ट्रायसायकल भंगारात, सामाजिक बांधिलकीचा प्रश्न
छावा डिजिटल न्यूज पोर्टल |राजेश बाष्टे, अलिबाग दि. 30 मे २०२६
विद्यानगर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जयपूर फूट संस्थेची ‘श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिति’ द्वारे पुरवलेली पिवळी दिव्यांग ट्रायसायकल एका व्यक्तीकडे न वापरता पडून होती. वापर न करता थेट ती भंगारात पाठवण्यात आली.
चांगल्या स्थितीत असलेली ही सायकल गाड्यावर टाकून नेण्यात येत आहे. सायकलवर अजूनही ‘jaipurfoot.org’ चा बोर्ड तसाच आहे. म्हणजे ती वितरणानंतर कधी वापरलीच गेली नाही.
प्रश्न हा आहे: जी सायकल एका अपंग व्यक्तीच्या पायांवर उभं राहण्याचं स्वप्न असते, ती न वापरता भंगारात का? त्याच्यापेक्षा एखाद्या गरजू दिव्यांगाला दिली असती तर त्याचं आयुष्य बदललं असतं. कोणाचा तरी आधार बनली असती.
स्थानिकांची भावना “मदत म्हणजे फक्त घेणं नाही, तर ती योग्य हातात पोहोचवणं पण आहे. अशी साधनं भंगारात न जाता गरजूंपर्यंत पोहोचली पाहिजेत.”
‘अलिबागचा रॉजर’ आवाहन तुमच्याकडेही वापरात नसलेली दिव्यांग साहित्य, व्हीलचेअर, काठी असेल तर भंगारात न देता गरजूंपर्यंत पोहोचवा. एक छोटा प्रयत्न, कोणाचं तरी आयुष्य घडवू शकतो.
सेवा हीच खरी पूजा
![]()

