सहकारी बँकांमध्ये मोठा भूकंप RBI चा नवा नियम लागू वर्षानुवर्षे खुर्ची पकडून बसलेल्या संचालकांना आता बसणार झटका

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – PTI मुंबई –दि. २७ मे २०२६

सहकारी बँकांमध्ये अनेक वर्षांपासून एकाच गटाचे किंवा व्यक्तीचे वर्चस्व असल्याच्या तक्रारी वाढत असतानाच आता RBI ने मोठा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार सलग 10 वर्षे संचालक राहिल्यानंतर संबंधित व्यक्तीला बोर्डपासून दूर व्हावे लागणार आहे. त्यामुळे अनेक सहकारी बँकांमध्ये आता मोठे राजकीय आणि आर्थिक बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे ग्रामीण भागातील आणि तालुकास्तरावरील अनेक सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्षे त्याच चेहऱ्यांचे वर्चस्व राहिल्याचे आरोप होत होते. आता RBI च्या या निर्णयामुळे “एकाच घराण्याची सत्ता” मोडण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा बँकिंग क्षेत्रात रंगली आहे. RBI ने यापूर्वीही ऑडिट, रिस्क मॅनेजमेंट, बोर्ड गव्हर्नन्स आणि कॅपिटल नियम अधिक कडक केले होते. मात्र आता लागू करण्यात आलेला “Cooling-Off Period” हा सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी मोठा धक्का मानला जात आहे.तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे सहकारी बँकांमध्ये पारदर्शकता वाढेल, बोर्डाची स्वायत्तता मजबूत होईल आणि भविष्यातील गव्हर्नन्स घोटाळ्यांना आळा बसू शकतो. आता अनेक सहकारी बँकांमध्ये बदलाचे वारे वाहणार का? जुन्या गटांचे वर्चस्व संपणार का?  RBI च्या या निर्णयाने सहकार क्षेत्रात नवी क्रांती येणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे…

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *