मांडवा परिसरातील आज धक्कादायक प्रकार शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग व्हॅन चालकावर POCSO अंतर्गत गुन्हा

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, अलिबाग मांडवा १७ एप्रिल २०२६ 

         सचिन मयेकर      

अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शाळेत ये-जा करणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी स्कूल व्हॅन चालकाविरोधात ‘POCSO’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी व्हॅनने प्रवास करत होती. यावेळी संबंधित चालकाने तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला. घरी परतल्यानंतर विद्यार्थिनीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला.

यानंतर संतप्त पालकांनी तात्काळ मांडवा सागरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच ‘POCSO’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळा प्रशासन आणि वाहतूक व्यवस्थेवर अधिक कडक नियंत्रण ठेवण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

आज सकाळी ही घटना घडल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीसांकडून सखोल तपास सुरू असून फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *