तुर्भे MIDC हादरलं ‘हाय-प्रोफाइल’ देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; व्हॉट्सअपवर सौदेबाजी, लॉजमध्ये काळा कारभार – पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक, मॅनेजरसह तिघे रंगेहात अटकेत, दोन महिलांची सुटका; अजून मोठे धागेदोरे उघड होण्याची शक्यता

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, वाशी ,शनिवार २८ मार्च २०२६

तुर्भे MIDC परिसरात सुरू असलेल्या ‘हाय-प्रोफाइल’ देहव्यापाराच्या घाणेरड्या रॅकेटचा गुन्हे शाखेने मोठा भांडाफोड करत धडाकेबाज कारवाई केली आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्राहकांशी सौदेबाजी करून लॉजमध्ये चालणाऱ्या या काळ्या कारभारावर पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक करत संपूर्ण रॅकेट उध्वस्त केले.

पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने सापळा रचला. या रॅकेटमध्ये व्हॉट्सअॅपवरून महिलांचे फोटो पाठवून ग्राहकांशी व्यवहार ठरवले जात असल्याची माहिती समोर आली होती.

यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवत जाळे विणले. लॉजमध्ये व्यवहार निश्चित होताच बाहेर दबा धरून बसलेल्या पथकाने तात्काळ छापा टाकत संपूर्ण रॅकेट उघड केले. या कारवाईत लॉज मॅनेजर सुशील कुमार नरेश शर्मा (46), वेटर उपेंद्र कुमार यादव (24) आणि छोटन कुमार यादव (28) यांना रंगेहात अटक करण्यात आली.

तपासात आरोपी लॉजच्या खोल्यांचा वापर देहव्यापारासाठी करत असल्याचे उघड झाले आहे. या धडक कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून त्यांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.

या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध पीटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश देशमुख आणि त्यांच्या पथकाकडून या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

MIDC सारख्या औद्योगिक परिसरात अशा प्रकारचा घाणेरडा धंदा सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, “अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी जोर धरत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *