सिंघम स्टाईल अधिकारी हर्षद हिंगे यांची API पदावर दमदार झेप

वर्दी फक्त अंगावर नसते… ती रक्तात जिद्द आणि मनात जनतेसाठी लढण्याची आग घेऊन येते

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल, रायगड सचिन मयेकर, दि. २१ /०५/२६

जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र झटणारे, अन्यायाविरोधात खंबीरपणे उभे राहणारे आणि आपल्या धडाकेबाज कार्यशैलीने “सिंघम” अशी ओळख निर्माण करणारे हर्षद दर्शना सुनिल हिंगे साहेब यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर Assistant Police Inspector (API) पदावर दमदार झेप घेतली असून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कर्तव्य, शिस्त, धैर्य आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. प्रामाणिकपणा, धडाकेबाज कामाची पद्धत, अन्यायाविरोधात कठोर भूमिका आणि सर्वसामान्य जनतेशी आत्मीयतेने वागणारा अधिकारी म्हणून हिंगे साहेबांनी आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली होती. “सिंघम” स्टाईल काम करणारे अधिकारी म्हणून त्यांनी अनेकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. कोणत्याही दबावाला न झुकता कर्तव्य पार पाडणारे, गुन्हेगारीविरोधात आक्रमक भूमिका घेणारे आणि गरजूंना मदतीचा हात देणारे अधिकारी अशी त्यांची ओळख आजही कायम आहे.  गुन्हेगारीसमोर कठोर… पण सामान्य जनतेसाठी दयाळू आणि मदतीला धावून जाणारे अधिकारी म्हणून हिंगे साहेबांनी आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण केली आहे. स्वबळावर, अथक मेहनतीवर आणि प्रामाणिक सेवाभावावर त्यांनी हे यश संपादन केले असून पोलीस दलासह मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांचे जोरदार अभिनंदन केले जात आहे.  काही वर्षांपूर्वी रेवदंडा पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना हिंगे साहेबांनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीची विशेष छाप सोडली होती. रेवदंडा परिसरात त्यांच्या कार्यकाळात अनेकांना न्याय मिळाला, तर गुन्हेगारीविरोधातील त्यांच्या कठोर भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.

हर्षद हिंगे साहेब यांना “छावा” परिवारातर्फे मानाचा मुजरा, मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *