विशेष धमाका — छावा एक्सक्लुसिव्ह सावकारशाहीचा राक्षस पुन्हा जिवंत! पोलीस अधिकारीसुद्धा झाले बळी
नाशिक | छावा प्रतिनिधी
🔥 छावा अभियान सुरू! सावकारशाहीविरुद्ध निर्णायक लढा!
नाशिकमधील घटनेनंतर “छावा”ने अवैध सावकारीविरोधात जनजागृती आणि न्यायासाठी निर्णायक पाऊल उचललं आहे.राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, तसेच आर्थिक शोषणाला कंटाळलेले लोक
👉 तुमच्याकडे जर सावकारी, धमक्या किंवा जबरदस्तीच्या व्यवहाराचे पुरावे असतील, तर ते लेखी स्वरूपात ‘छावा संपादकीय मंडळा’कडे पाठवा.आम्ही तुमची माहिती गोपनीय ठेवत, कायद्याच्या चौकटीत राहून संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचवू.हे अभियान कोणाविरुद्ध नाही अन्यायाविरुद्ध आहे.हा फक्त आवाज नाही… हा न्यायासाठीचा रणसंग्राम आहे!राज्यातील सावकारशाहीचं सावट आता सामान्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. नाशिक शहरात घडलेली ताजी घटना राज्यव्यवस्थेलाच हादरवणारी आहे. पोलिसात उच्च पदावर कार्यरत असलेली महिला पोलीस उपनिरीक्षक (PSI) अवैध सावकारांच्या जाळ्यात अडकली, धमक्या मिळाल्या आणि बेघर करण्याची वेळ आली.
सावकारशाहीचा भयावह चेहरा
नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली. उपनिरीक्षक निशा वाकडे यांनी जानेवारी महिन्यात काही सावकारांकडून १० लाख रुपये कर्ज घेतले होते. तेही ३.५ टक्के प्रतिमहिना व्याजाने — म्हणजे बेकायदेशीर सावकारी!कर्जासाठी त्यांनी आपला फ्लॅट गहाण ठेवला होता. पण, पैसे वेळेत न फेडल्यावर सावकारांनी सुरू केली धमकींची मालिका “फ्लॅट विकून तुला रस्त्यावर आणू.
गुन्हा दाखल — पण सावकार मोकाट!
या प्रकरणी विक्की कुमावत, सोनाली, देवयानी आणि अनंता पवार या चौघांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम १९४६ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी महिला संशयित सोनाली हिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असलं तरी बाकीचे सावकार अद्याप मोकाट फिरत आहेत.
छावा विश्लेषण:
सावकारशाहीचा हा कहर फक्त शेतकरी, मजूर वा सर्वसामान्यांपुरता नाही — आता तर कायद्याचे रक्षणकर्तेही तिच्या जाळ्यात सापडू लागलेत!राज्य प्रशासनाने आता केवळ प्रकरणं दाखल करण्यापेक्षा अवैध सावकारांविरुद्ध सर्वंकष मोहीम राबवावी, अशी मागणी समाजातून होत आहे.
जनतेचा आक्रोश
जर पोलीस अधिकारीसुद्धा सावकारांच्या जाळ्यात अडकत असतील, तर सामान्य माणूस कुठं जाईल?”
छावा पोर्टलचा सवाल:
👉 सावकारी अधिनियम फक्त कागदावर का?
👉 पोलिसांनाच जर आर्थिक साखळीत अडकवता येत असेल, तर शासन कुठं आहे?
👉 सावकारांचे राजकारणाशी संबंध आहेत का?
🟥 छावा अभियान सुरू — सावकारशाही हद्दीतून हद्दपार करा.
✊ सावकारांच्या बेकायदेशीर साम्राज्याविरुद्ध आता “छावा” आवाज उठवणार आहे.तुमच्याही भागात असलेली अशी कोणती सावकारी प्रकरणं असतील, तर ती आमच्यापर्यंत पोहोचवा.
![]()

