AI 3D फोटो” – आकर्षण की सापळा?
आज दुपारी २:३० वाजता हा लेख प्रकाशित होणार होता. मात्र तांत्रिक कारणामुळे थोडा विलंब झाला. आता लेख उपलब्ध आहे. वाचा आणि शेअर करा फक्त छावावरच खुलासा.
कधी विचार केला आहे का? तुम्ही आत्ता अपलोड केलेला साधा फोटो उद्या कुणाच्या हातात शस्त्र बनून तुमच्याच विरोधात उभा राहिला, तर? होय! हे फक्त कल्पना नाही, तर वास्तविक धोक्याची शक्यता आहे.
सचिन मयेकर ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १६ सप्टेंबर २०२५
सोशल मिडीयावर नवीन आकर्षण AI 3D फोटो. Google Gemini, Instagram, CapCut, PopPic… कुठलंही ॲप घ्या, सेकंदाभरात साधा सेल्फी miniature, सिनेमॅटिक 3D लुकमध्ये बदलतो. दिसायला भन्नाट..म्हणूनच मुलं-मुली धडाधड हा ट्रेंड वापरत आहेत. पण या झगमगाटामागचं काळं सत्य थोडं भयावह आहे.
फोटो नाही, भविष्य गमावता फोटोसोबत metadata (location, device info) पण निघतो. उद्या कुणाला तुमचं ठिकाण शोधायला काही सेकंद लागणार नाहीत.
एक क्लिक एक संकट AI तोच फोटो बदलून अश्लील, अपमानास्पद इमेज बनवतो. आणि तो व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये, सोशल मिडीयावर फिरला, तर?
मानसिक आघात ज्यांचा फोटो misuse झाला, त्यांचं नैराश्य, आत्मविश्वास गमावणं… ही जखम कोणत्याही फिल्टरने मिटवता येत नाही.
कायद्याचं गोंधळ deepfake आणि AI misuse वर कायदे अजून स्पष्ट नाहीत; तक्रार दिल्यावर न्याय मिळायला महिने-जणं लागू शकतात.
Gemini आणि मोठ्या ॲप्सबद्दल सत्य “मोठं नाव 100% सुरक्षित” नाही
Gemini, Google, Instagram सारखी मोठी संस्था तुलनेने विश्वासार्ह असली तरी याचा अर्थ पूर्ण सुरक्षितता नाही. कारण Cloud processing: फोटो प्रोसेस करण्यासाठी क्लाऊड सर्व्हरवर पोहोचतो म्हणजे डेटा कंपनीच्या control मध्ये जातो.
Privacy policy बदलण्याची शक्यता: आजची धोरणे उद्या बदलू शकतात.
डेटा breach ची भीती: मोठ्या कंपन्यांनीही breaches सहन केले आहेत.
Public sharing चा खरा धोका: तुम्ही तयार केल्यानंतर फोटो जर सार्वजनिक केला तर तो कोणत्याही हातात जाऊ शकतो आणि तिथेच खरी समस्या सुरु होते.
“Gemini आणि इतर ॲप तुलनेने सुरक्षित असू शकतात, पण सावधगिरी तिथेही गरजेची आहे. Safe app नसतो फक्त सुरक्षित वापरकर्ता असतो.
पालकांनो, मुलांना फक्त “नको करू” म्हणून थांबवू नका समजावून सांगा. फोटो हा फक्त फोटो नाही, तो प्रतिष्ठेचा आरसा आहे. शाळा, कॉलेजांनी सोशल मिडिया वापरावर स्पष्ट नियम ठरवायला हवेत. नाहीतर आजचा “fun filter” उद्या मुलांच्या आयुष्याचा अभिशाप ठरू शकतो.
1. फक्त अधिकृत ॲप वापरा परंतु तरीही सावध राहा (Gemini/Instagram/CapCut).
2. अनोळखी लिंक/वेबसाईटवर फोटो अपलोड करू नका.
3. संवेदनशील फोटो टाळा – युनिफॉर्म, घराजवळचे फोटो, लहान मुलांचे फोटो.
4. फोटोवर वॉटरमार्क लावा misuse झाल्यास मूळ ओळख पटेल.
5. मित्रांचा दबाव टाळा ट्रेंडमध्ये उडी मारण्यापेक्षा विचार करणं शहाणपण आहे.
misuse झाल्यास तातडीचे पावले
स्क्रीनशॉट घ्या; पुरावे सुरक्षित ठेवा.
संबंधित प्लॅटफॉर्मवर त्वरित report करा.
सायबर सेल / पोलीस ठाण्यात FIR नोंदवा.
घाबरून न जाता, धैर्याने आणि कायदेशीर मार्गाने लढा.
छावा चे आवाहन
युवकांनो, फोटो-फिल्टरचं आकर्षण आहेच. पण आठवा फोटो हा केवळ एक इमेज नाही, तो तुमच्या प्रतिष्ठेचा आरसा आहे. आजचा एक चुकीचा निर्णय उद्या आयुष्यभराचं संकट ठरू शकतो.
👉 छावा चे स्पष्ट आवाहन :
जागरूक राहा, सजग राहा आणि स्वतःचं तसेच आपल्या मित्रपरिवाराचं भविष्य सुरक्षित ठेवा. ट्रेंड्सच्या मोहात आयुष्याशी खेळ करू नका.
![]()

