इन्स्टाग्राम प्रकरणात मोठी अपडेट अल्पवयीन मुलाविरुद्ध गंभीर गुन्हा सायबर तक्रारीनंतर रेवदंडा पोलिसांची कारवाई

छावा डिजिटल न्यूज मीडिया  सचिन मयेकर ता.२३ ऑक्टोबर २०२६ 

 रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेरोंडा येथे राहणाऱ्या सुमारे १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दोन लैंगिक स्वरूपाचे व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित व्हिडिओचाही समावेश असल्याची माहिती आहे.

सदर व्हिडिओ जानेवारी महिन्यात शेअर करण्यात आले होते.या प्रकरणाची तक्रार सायबर यंत्रणेमार्फत रेवदंडा पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात येऊन अटक करण्यात आली आहें.

या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३३/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

सोशल मीडियावर काहीही शेअर करण्यापूर्वी विचार करा. विशेषतः बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री प्रसारित करणे गंभीर कायदेशीर परिणाम घडवू शकते. मोबाईलचा वापर करताना कायद्याचे भान ठेवा आणि डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करा.

एका क्लिकपूर्वी विचार करा; निष्काळजीपणा महागात पडू शकतो.

 छावा डिजिटल न्यूज मीडिया

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *