
भाग २ – १२ ऑगस्ट १९४७ : रक्ताची चाहूल
दिनांक : १२ ऑगस्ट २०२५ लेखक : सचिन मयेकर छावा न्यूज पोर्टल स्वातंत्र्याचा ऐतिहासिक क्षण आता फक्त तीन दिवसांवर आला होता. दिल्लीतील लाल किल्ला, संसद भवन आणि सरकारी इमारतींना रोषणाई लावण्याची तयारी सुरू होती. गल्लीबोळांत झेंडे रंगवणारे कारागीर, वायसरॉय हाऊसपासून ते काँग्रेसच्या बैठकीपर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण… पण हा उत्साह देशाच्या सर्व भागात सारखा नव्हता. पंजाब…