विहूर रस्त्यावर महाकाय वडाचे झाड कोसळले
सुदैवाने जिवित व वित्त हानी टळली मुरुड (प्रतिनिधी) अलिबाग -मुरुड रस्त्यावर मोरे ते विहूर पेट्रोल पंप दरम्यान शेकडो वर्षे जुने असलेले महाकाय वडाचे झाड पहाटेच्या वेळेत रस्त्यावर आडवे कोसळले. यावेळेत वाहतूक तुरळक प्रमाणात असल्याने सुदैवाने जिवित व वित्त हानी टळली. राज्यात गेले काही दिवसांपासून वीजांच्या कडकडाटासह जोरदार वादळीवाऱ्यासह पावसाने मुरुडमध्ये अक्षरशः थैमान घातले.यामुळे नागरिकांची तारांबळ…