
अजूनही माणुसकी मेलेली नाही…
छावा, संपादकीय | दि. ०४ जुलै आजच्या घडीला बातम्या पाहिल्या, ऐकल्या किंवा सोशल मीडियावर स्क्रोल केलं, की सर्वत्र फक्त नकारात्मकतेचं चित्र दिसतं — कुठे अपघात, कुठे खून, कुठे भ्रष्टाचार, कुठे नात्यांमध्ये विघटन. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला वाटतं, की आता जगात माणुसकीच उरलेली नाही. पण त्याच वेळी काही साधेसे प्रसंग, काही हळुवार क्षण आपल्याला दाखवून देतात…