
Category: महाराष्ट्र
जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन
छावा, दि.०९ | बुलडाणा | वृत्तसंस्था | खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जैविक निविष्ठा बनवून त्याचा वापर पिकासाठी करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले. राज्य पुरुस्कृत कापूस व सोयाबीन मूल्यसाखळी वाढ विकास योजनेंअंतर्गत बांधावर जैविक लॅब प्रयोगशाळा उभारण्यात आले आहेत. खरीप हंगाम सन 2025-26 च्या दृष्टीने क्षेत्रीय स्तरावर जैविक लॅबमार्फत…

वटपौर्णिमा विरुद्ध पिंपळपौर्णिमा, भांडकुदळ बायको ७ जन्मी नकोच; पिंपळाला फेऱ्या मारत पुरुषांची प्रार्थना
छावा ; दि. ०९ जून | छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी वटपौर्णिमा विरुद्ध पिंपळपौर्णिमा, भांडकुदळ बायको ७ जन्मी नकोच; पिंपळाला फेऱ्या मारत पुरुषांची प्रार्थना…

चिपळूणमध्ये अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश
गोपनीय माहितीनंतर धडक कारवाई ६५ वर्षीय इसम अटकेत ; १९ हजारांचा मुद्देमाल जप्त छावा ; दि. ०८ जून | चिपळूण | प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्री व सेवनावर नियंत्रण ठेवण्याच्या मोहिमेला चिपळूण पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. शुक्रवारी, ६५ वर्षीय इसमाच्या ताब्यातून १९,६२० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी आरोपीस अटक…

कायद्यापलीकडील करुणामय कर्तव्य “भूतदया”
चिपळूण पोलिसांची हृदयस्पर्शी यशोगाथा छावा ; दि. ०८ जून | चिपळूण | प्रतिनिधी कधी कधी माणुसकीची खरी ओळख कुणा शब्दांमध्ये नाही, तर कृतीत दिसते… आणि अशाच एका क्षणी चिपळूण पोलिसांनी मूक प्राण्याच्या वेदनेवर फुंकर घालणारा माणुसकीचा हात पुढे केला. आपल्या देशात गाईला माता मानले जाते, पण जेव्हा अशी गाय भुकेने व्याकूळ, अशक्त आणि जखमी अवस्थेत…
नवी मुंबई, रायगडमध्ये मुसळधार पावसाची दमदार हजेरी
पुढील काही तास निर्णायक वाऱ्यांचा वेग ५० किमी प्रतितास अलिबाग | छावा ; दि. ०७ जून, प्रतिनिधी | नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, पुढील काही तासांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून, नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला…
कल्याण-डोंबिवलीत जोरदार पावसाची हजेरी
केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्यांची उघड झाली पोलखोल कल्याण-डोंबिवली | छावा; ७ जून, प्रतिनिधी | कल्याण-डोंबिवली परिसरात मागील काही दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असताना आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी सुरू झालेला जोरदार पाऊस काही वेळासाठी थांबला असला, तरी दुपारी पुन्हा एकदा तासाभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला असला, तरी…
मुंबईत मुसळधार पावसाचा कहर
हवामान खात्याचा रेड अलर्ट नागरिकांना सतर्कतेचा इशारा मुंबई | छावा ; ७ जून, वृत्तसंस्था | मुंबई आणि परिसरात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, भारतीय हवामान खात्याने पुढील ३ तासांसाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. यामुळे मुंबईकरांनी अत्यंत आवश्यक असेल, तेव्हाच घराबाहेर पडावे, असा सल्ला मुंबई महापालिकेने दिला आहे. मुंबईत मान्सून काही दिवसांपूर्वी दाखल…
भाजप आणि काँग्रेस विरहित शिवसेना हीच महाराष्ट्राची गरज
महायुतीला घरातील नेत्याचाच आहेर अखंड शिवसेनेच्या पुनर्स्थापनेसाठी ठाकरे बंधूसह शिंदेंनाही गजानन कीर्तिकरांची भावनिक साद मुंबई | छावा, दि.०७, वृत्तसंस्था | “भाजप आणि काँग्रेस विरहित शिवसेना हीच महाराष्ट्राची गरज आहे.” असे वक्तव्य करत गजानन कीर्तिकर यांनी महायुतीला घरचाच आहेर दिला आहे. या त्यांच्या कृतीमुळे शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कधीकाळी…
अवघा रंग शिवमय झाला
दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न शिवप्रेमींच्या घोषणांनी गड दुमदुमला; महाराजांच्या आठवणींना उजाळा अलिबाग (विशेष प्रतिनिधी, दि. ०६ जून) युगपुरुष, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक दिन दुर्गराज रायगडावर अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि ऐतिहासिक वातावरणात साजरा करण्यात आला. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. याप्रसंगी छत्रपती संभाजी…
शासकीय वसतीगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरु
अमरावती (वृत्तसंस्था, दि. ०६ जून) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अचलपूर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मागासवर्गीय प्रवर्गनिहाय रिक्त असणाऱ्या आरक्षित जागांनुसार समाजातील अनु.जाती, अनु.जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग व अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थी…