छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रनायक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन ♦ दुर्गराज रायगडावर शिवछत्रपतींचा तिथीवत राज्याभिषेक सोहळा संपन्न छावा • महाड, दि. ०९ जून (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी) | विशेष प्रतिनिधी  “रायगड ही पवित्र भूमी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. जर शिवराज्याभिषेक झाला नसता तर आपण आज इथे नसतो. त्यांनी जात, पात, धर्म या सर्व भिंती मोडून ‘रयतेचे राज्य’ प्रस्थापित केले….

Loading

Read More

कोकणाच्या जलद विकासासाठी महामार्गांची उभारणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन  छावा • माणगाव, दि. ९ जून | प्रतिनिधी “नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या कोकणाच्या जलदगतीने विकासासाठी रस्ते आणि महामार्गांची उभारणी अत्यंत गरजेची असून, प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माणगाव येथे केले. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई शाळेच्या नव्या इमारतीच्या…

Loading

Read More

आपत्ती काळात माध्यमांना सत्य व अचूक माहिती द्यावी

अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या प्रशासनाला सूचना छावा • मुंबई | प्रतिनिधी  “आपत्तीच्या काळात जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व सत्य माहिती पोहोचवणे ही अत्यंत गरजेची बाब असून, त्यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अधिक सजग राहून माध्यमांना सत्य घटनांची माहिती देण्याची जबाबदारी पार पाडावी,” असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केले. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्ती…

Read More

शिवप्रेमींसाठी सुवर्णसंधी…..

छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किटचा भव्य शुभारंभ शिवराज्याभिषेकदिनी प्रेरणादायी इतिहासयात्रेला सुरुवात  छावा| मुंबई, दि. ९ | प्रतिनिधी भारतीय रेल्वेच्या भारत गौरव यात्रा अंतर्गत सुरु झालेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट’ या विशेष रेल्वेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून पार पडला. या ऐतिहासिक उपक्रमाचा प्रारंभ करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी…

Loading

Read More

शाळांमधून स्टार्टअप संस्कृतीकडे वाटचाल

‘सक्षम’ ठरतोय परिवर्तनाचा मंत्र ♦ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना छावा | मुंबई, ९ जून | विशेष प्रतिनिधी राज्य शासनाच्या सहकार्याने उद्यम लर्निंग फाउंडेशन मार्फत नागपूर व अमरावती जिल्ह्यांतील शासकीय व अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आलेला ‘सक्षम’ उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशील मानसिकता विकसित करण्याच्या दिशेने एक प्रभावी पाऊल ठरला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना मुख्यमंत्री…

Loading

Read More

…खऱ्या आखाड्यात उतरलो आहोत ..!

डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचे प्रतिपादन शेकडो कार्यकर्त्यांसह हाती घेतला धनुष्यबाण छावा | मु. पो. ठाणे, दि.१० | प्रतिनिधी “आता नकली आखाडा सोडून खऱ्या आखाड्यात उतरलो आहोत,” असे ठाम वक्तव्य करत डबल महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान चंद्रहार पाटील यांनी आज शेकडो समर्थकांसह शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. सांगली जिल्ह्यातील उबाठा गटाचे पदाधिकारी असलेले चंद्रहार…

Loading

Read More

आरसीएफ प्रशासनाला शेकापचा अल्टीमेटम

स्थानिक प्रवेशाबंदीविरोधात आंदोलनाचा इशारा छावा, दि. ०९ | अलिबाग (जि. रायगड) | प्रतिनिधी |  रासायनिक खत निर्माता असलेल्या आरसीएफ कंपनीने आपल्या कर्मचारी वसाहतीत स्थानिक ग्रामस्थांच्या प्रवेशावर बंदी घातल्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाच्या आरसीएफ गेट संघर्ष समितीने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या…

Loading

Read More

रेल्वे अपघातात गंभीर जखमी प्रवाशांना उपमुख्यमंत्री शिंदेंची साथ

छावा | मु.पो. ठाणे, दि.१० | प्रतिनिधी  मुंब्रा आणि दिवा उपनगरी रेल्वे स्थानकांदरम्यान घडलेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांनी जखमी प्रवाशांची प्रकृतीची विचारपूस करत त्यांच्या उपचारांविषयी डॉक्टरांकडून सविस्तर माहिती घेतली. या अपघातात ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू…

Loading

Read More

कोळी समाजाच्या श्रद्धेचा संगम : मुरुडमध्ये कालभैरव मंदिराचे भव्य उद्घाटन

छावा, दि .०९ | मुरुड (रायगड) | प्रतिनिधी |   मुरुड कोळीवाड्यात कालभैरव मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला उत्साही आणि भावनिक वातावरण लाभले. या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या चित्रलेखा पाटील यांनी समाजाच्या श्रद्धेला योग्य न्याय देत आपली बांधिलकी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली. चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने आणि निधीच्या साहाय्याने उभारण्यात आलेल्या या मंदिरासाठी सुमारे ९…

Loading

Read More