
Category: महाराष्ट्र

रायगडमध्ये समुद्रात मोठी दुर्घटना – खांदेरी किल्ल्याजवळ मासेमारी बोट बुडाली, ५ जणांचा जीव वाचला, ३ जण बेपत्ता – शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू
रायगड – छावा मराठी, सचिन मयेकर रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक खांदेरी किल्ल्याजवळ आज सकाळी मासेमारीसाठी गेलेली एक बोट समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर खळबळ उडाली आहे. बोटीत एकूण ८ मच्छीमार होते. त्यातील पाच जणांनी पोहत किनाऱ्यावर येत आपला जीव वाचवला आहे, तर उर्वरित तीन जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध…

तोफांचे गारूड आणि एक वीर प्राण! – निलेश तुणतुणे : कारगिलचा रणबीर
आज, २६ जुलै — कारगिल युद्धाचा २६ वा स्मृतिदिन! ज्या रणभूमीत भारतीय शूरवीरांनी मातृभूमीसाठी प्राण अर्पण केले, त्या वीरांना “छावा – मराठी डिजिटल न्यूज नेटवर्क” व SMNEWS मराठी न्युज चॅनेल तर्फे वीरांना मानाचा सलाम! व मानाचा मुजरा! तोफांचे गारूड आणि एक वीर प्राण! – निलेश तुणतुणे : कारगिलचा रणबीर लेखक – छावा – सचिन मयेकर…

श्रावण: सात्त्विकतेचा सुगंध, भक्तीचा संकल्प.
‘छावा’ संपादकीय | दि. २५ जुलै | सचिन मयेकर पावसाच्या सरींनी निसर्ग हरित झाला आहे. नदी, नाले, डोंगर, झाडं, पक्षी आणि वातावरण नवजीवनाने बहरलेलं आहे. आणि अशा या निसर्गाच्या पुनर्जन्माच्या पार्श्वभूमीवर हिंदू संस्कृतीत सर्वाधिक पवित्र मानला जाणारा ‘श्रावण मास’ आजपासून सुरू होतोय. श्रावण हा केवळ एक महिना नसून शुद्ध सात्त्विक जीवनशैलीचा आरंभ, मनाला संयमात ठेवण्याचा…

गटारी अमावस्या: एक सांस्कृतिक आणि शास्त्रीय दर्शन
‘छावा’ संपादकीय | दि. २४ जुलै | सचिन मयेकर श्रावण सुरु होण्याआधीचा सर्वांच्या लक्षात असणारा एक विशेष दिवस म्हणजे गटारी अमावस्या. अनेक ठिकाणी या अमावस्येला दर्श अमावस्या किंवा सोमवती अमावस्या असेही म्हणतात. सर्वसामान्यांच्या मनात या दिवसाची ओळख म्हणजे मज्जा-मस्ती, गोंधळ, मित्रांसोबत पार्टी आणि भरपेट मांसाहार असा असतो. मात्र या दिवसामागील मूळ अर्थ आणि परंपरा बऱ्याचदा…

अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
चौल नाका, कुरुळ-नागाव परिसरात वाहतूक धोक्यात छावा दि. २१ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) अलिबाग ते रेवदंडा मार्गावरील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले असून, या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे मोठ्या संकटाचे कारण ठरत आहे. खड्ड्यांमुळे गाड्या सतत आपटत असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे….

संपादकीय भाग ४ -ज्यांनी स्मृती जपल्या – त्यांचं आपण काय केलं?
छावा, संपादकीय | दि. २० जुलै (सचिन मयेकर) रामदास बोट दुर्घटनेनंतर स्मारक, शासन आणि समाजाच्या प्रतिक्रियेचा लेखाजोखा मृत्यू लाटांमध्ये, स्मृती किनाऱ्यावर… १७ जुलै १९४७ रोजी समुद्रात बुडालेल्या ‘रामदास’ बोटीतून सुमारे ७०० हून अधिक जण कधीच परतले नाहीत. मात्र, त्यांची नावे परत आली – आठवणीतून, स्वप्नांतून, आणि कुठल्यातरी कोपऱ्यातल्या घरगुती देवघरातून. आज ७८ वर्षांनंतरही, ती घटना…

निजामपूरचं नवं नाव – आता रायगडवाडी
छावा दि. १९ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) रायगड जिल्ह्यातील छत्रा–निजामपूर ग्रामपंचायतीच्या नावात बदल करत आता रायगडवाडी हे नाव देण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याची अधिकृत घोषणा विधानसभेत केली. ही फक्त एक नावबदलाची कारवाई नसून — इतिहास, अस्मिता, आणि स्वाभिमानाशी जोडलेली एक वैचारिक जाणीव आहे. छत्रपति शिवाजी महाराजांनी जिथे हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली,…

संपादकीय भाग ३ – कोण बुडालं? बोट की यंत्रणा? – ‘रामदास’ दुर्घटनेतील तांत्रिक दोषांचा अभ्यास
छावा, संपादकीय | दि. १९ जुलै(सचिन मयेकर) १७ जुलै १९४७ रोजी झालेली ‘रामदास’ बोट दुर्घटना ही केवळ निसर्गाचा कहर नव्हता. तो होता मानवनिर्मित चुकांचा एक साखळीप्रकार, जिथे बोटीची रचना, प्रशासनाची दुर्लक्ष आणि हवामान यांचा अपायकारक संगम झाला. बोटीची रचना आणि कमतरता ‘रामदास’ ही ९० फूट लांब, २४ फूट रुंद आणि ११ फूट खोल बोट होती….

गोळा स्टॉपजवळ एसटी बसची धडक वृद्ध पादचारी महिलेचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
छावा दि. १९ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) गोळा स्टॉपजवळ गुरुवारी (दि. १८ जुलै) एक दुर्दैवी अपघात घडला. बोर्ली गावातील मधला पाडा येथील ७७ वर्षीय मथुरा रामचंद्र वरसोलकर या रस्त्याने पायी जात असताना, पाठीमागून आलेल्या एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्या घटनास्थळीच मृत्युमुखी पडल्या. मथुरा वरसोलकर या रेवदंडा…

सलाम तुझ्या बहाद्दूरीला…
छावा दि.१८ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) सलाम तुझ्या बहाद्दूरीला… गेली का रे परत? एमएसईबी वाले काही करत नाहीत का? – असे आपण सहज म्हणतो… पण लाईट परत येते कशी? कोण आणतो ती? रेवदंडा गावातील या फोटोतील योद्ध्याकडे पाहा — सुमारे २८ फूट उंच पोलावर चढलेला, अंगावर धूप आणि डोक्यावर धोका… फक्त आपल्या घरात पुन्हा उजेड…