
Category: देश-विदेश

WWE दिग्गज हल्क हॉगन यांचे निधन; ७१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्ली | WWE अर्थात वर्ल्ड रेसलिंग इंटरटेन्मेंटच्या रंगमंचावर आपल्या ताकदीच्या आणि शैलीदार खेळाच्या जोरावर जगभरात लोकप्रियता मिळवलेले दिग्गज रेसलर हल्क हॉगन (Hulk Hogan) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७१व्या वर्षी, फ्लोरिडा येथील त्यांच्या राहत्या घरी गुरुवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती समोर आली आहे. हल्क हॉगन यांचे संपूर्ण…

वीर चंद्रशेखर आझाद : स्वातंत्र्याची शपथ घेणारा “आझाद” क्रांतिकारक!
छावा, संपादकीय | दि. २३ जुलै (सचिन मयेकर) भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची कहाणी ही फक्त राजकीय वाटाघाटी, सभासद मंडळं आणि शांततेच्या आंदोलनांची नाही, तर ती आहे क्रांतीची, त्यागाची आणि रक्ताच्या थेंबातून लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या ओळींची. या संघर्षामध्ये अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यापैकी एक झुंजार, निर्भय आणि तेजस्वी योद्धा म्हणजे चंद्रशेखर आझाद. २३ जुलै १९०६ रोजी झाशी…

आजचा हा लेख आपल्या लहान दोस्तांकरिता – शाळकरी बालगोपाळांसाठी खास लिहिला आहे. लोकमान्य टिळक या थोर देशभक्ताच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपल्या छोट्याशा मनात देशप्रेमाची बीजं रुजावीत, या उद्देशाने हे काही गोड शब्द खास तुमच्यासाठी!
छावा, संपादकीय | दि. २३ जुलै (सचिन मयेकर) लोकमान्य टिळक : स्वराज्याचा नारा देणारे आमचे शूर हिरो! मुलांनो, तुम्ही “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” हा वाक्य ओळखता का? हा नारा होता आपल्या भारतमातेसाठी लढणाऱ्या एका शूर, धीट, आणि चतुर देशभक्ताचा — ज्यांचं नाव होतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक! त्यांचा जन्म…

लोकमान्य टिळक : स्वराज्याची चेतना जागवणारा युगपुरुष
छावा, संपादकीय | दि. २३ जुलै (सचिन मयेकर) भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अनेक तेजस्वी, प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वं होऊन गेली. पण ज्या व्यक्तीने संपूर्ण जनतेच्या मनात स्वराज्याची जाणीव जागवली, अन्यायाविरुद्ध उघडपणे लढा दिला, लोकशक्तीला संघटित केलं, आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना केली, तो म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म…

संपादकीय लेख -२२ जुलै – राष्ट्रीय ध्वज दिन
छावा, संपादकीय | दि. २१ जुलै (सचिन मयेकर) भारतीय अस्मितेचा अभिमानाचा क्षण “ते फडकणारे तिन्ही रंग… एक ध्वज… पण करोडो भारतीयांची ओळख!” २२ जुलै – या दिवशी आपल्या स्वातंत्र्याचा खरा आत्मा, म्हणजेच भारतीय राष्ट्रध्वज ‘तिरंगा’ अधिकृतरीत्या स्वीकारण्यात आला. म्हणूनच आजचा दिवस ‘राष्ट्रीय ध्वज दिन’ म्हणून प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा, आत्मपरीक्षणाचा आणि देशप्रेम जागवण्याचा आहे. १९४७ साली…

बॉबी’ – जेव्हा प्रेमकथेचा चेहरा बदलला!
छावा, संपादकीय | दि. २१ जुलै (सचिन मयेकर) २१ जुलै १९७३ – हा केवळ एका चित्रपटाचा प्रदर्शनदिवस नव्हता, तर एक नवा सांस्कृतिक अध्याय सुरू होण्याचा क्षण होता. कारण याच दिवशी प्रदर्शित झाला होता दिग्दर्शक राज कपूर यांचा गाजलेला चित्रपट ‘बॉबी’, ज्याने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या हृदयावरही अधिराज्य गाजवलं. बॉबी हा चित्रपट अनेक कारणांनी…

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात तीव्र लढा!
महासंघाची साताऱ्यात राज्यस्तरीय सभा, बेमुदत आंदोलनाचा इशारा सातारा | २१ जुलै २०२५ राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन वेळोवेळी दुर्लक्ष करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ — (आयटक संलग्न) — यांच्याकडून संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार साताऱ्यात घेण्यात आला. येथील बाबासाहेब सोमण सभागृहात पार पडलेल्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण बैठकीत प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या…

एक जॉब असाही..
तुमचं काम काय? मी एक ज्येष्ठ नागरिकांची देखभाल करणारा आहे… या उत्तरात मानवीयतेचा, कर्तव्यबुद्धीचा आणि एका अवघड जबाबदारीचा सारा भार सामावलेला असतो. श्रीमंत घरात राहणारे, उद्योगपती किंवा कामानिमित्त सतत बाहेर असणारे लोक आपल्या घरातील वयोवृद्ध आई-वडिलांसाठी एक व्यक्ती ठेवतात. ती व्यक्ती केवळ ‘नोकरी’ करत नसते… ती जिव्हाळा, कळकळ आणि धीर यांचं काम करत असते. काम…

संपादकीय (भाग १): समुद्राने हिरावून घेतलेली गटारी — ‘रामदास’ बोटीच्या आठवणींचे ओझे
छावा- संपादकीय दि. १७ जुलै (सचिन मयेकर) १७ जुलै १९४७. देश स्वतंत्रतेच्या उंबरठ्यावर. स्वप्न, आशा, स्वातंत्र्याची चाहूल… आणि त्याच वेळी, कोकणातील शेकडो कुटुंबांवर दुःखाचा काळोख दाटून आला. तो दिवस — गटारी अमावस्या. उत्सवाच्या तयारीत असलेले लोक, मुंबईहून रेवदंड्याकडे निघालेली ‘रामदास’ नावाची मोटरबोट. कोण घरी सण साजरा करायला निघालं होतं, कोण आई-वडिलांना भेटायला, तर कोण नव्या…

शुभ आगमनानंतर आंतराळवीराची कुटुंबीयांशी भावनिक भेट
छावा – वॉशिंग्टन, अमेरिका दि.१६ जुलै आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (ISS) यशस्वी 18 दिवसांच्या मोहिमेनंतर भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुरक्षित परतले आहेत. त्यांचे आगमन अमेरिकेत झाल्यानंतर, त्यांची पत्नी कामना आणि चार वर्षांचा मुलगा त्यांची भेट घेण्यासाठी उपस्थित होते. या भावनिक भेटीचे काही हृदयस्पर्शी क्षण कॅमेर्यात टिपले गेले असून, सध्या हे फोटो सोशल मीडियावर…