वडिलांच्या निधनाचे दुःख सुरू असतानाच रिक्षावर चोरट्यांचा डल्ला लॉक तोडून महत्त्वाची कागदपत्रे आणि दोन हजारांची रोकड लंपास नियतीचा घाव कमी होता की काय? वडिलांच्या अंत्यविधीच्या दिवशीच रिक्षाचालकाच्या रिक्षातील लॉकर फोडून चोरट्यांनी साधली संधी

गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६… एका कुटुंबासाठी हा दिवस आयुष्यभर न विसरता येणारा ठरला. राजेश अशोक माळी यांचे वडील अशोक रामदास माळी यांचे निधन झाले. घरात दुःखाचा डोंगर कोसळला होता. वडिलांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले असतानाच अज्ञात चोरट्यांनी याच परिस्थितीचा फायदा घेत राजेश माळी यांच्या रिक्षाला लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

छावा डिजिटल न्यूज मीडिया ता.२३ नोव्हेंबर २६ सचिन मयेकर

राजेश माळी हे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात.घटनेच्या दिवशी सकाळी रिक्षाचे भाडे असल्याने त्यांनी नेहमीप्रमाणे आपला व्यवसाय केला. मात्र, दुपारच्या सुमारास त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी आपली रिक्षा नेहमीच्या ठिकाणी उभी केली आणि वडिलांच्या अंत्यविधी व इतर धार्मिक विधींमध्ये ते व्यस्त झाले.

मात्र, कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढवलेला असतानाच अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रिक्षाचे लॉक तोडले. एवढ्यावरच न थांबता हँडलखाली असलेले लॉकरही फोडून त्यातील महत्त्वाची कागदपत्रे आणि रोकड चोरून नेली.

चोरट्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, रिक्षाचे आरसी बुक,बँकेचे बँकेचे ए टी एम कार्ड्स, रिक्षा चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) यांसह १ हजार ८०० रुपये रोख आणि सुमारे २०० रुपयांची नाणी असा एकूण दोन हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. रिक्षा क्रमांक : MH-06-BV-4798 ज्या दिवशी वडिलांचे छत्र हरपले, त्याच दिवशी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या रिक्षातील महत्त्वाची कागदपत्रे आणि रोकड चोरीला जाणे, ही राजेश माळी यांच्यासाठी आणखी एक मोठी डोकेदुखी ठरली आहे. चोरीला गेलेली रोकड दोन हजार रुपयांची असली तरी आधारकार्ड, पॅनकार्ड, आरसी बुक आणि ड्रायव्हिंग लायसन्स व बँकेचे ए टी एम कार्ड्स, यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे पुन्हा मिळवण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एकीकडे वडिलांच्या निधनाचे दुःख, तर दुसरीकडे चोरीमुळे निर्माण झालेली चिंता… अशा दुहेरी संकटात राजेश माळी सापडले आहेत. या घटनेची चौकशी करून अज्ञात चोरट्यांचा शोध घ्यावा, तसेच चोरीला गेलेली महत्त्वाची कागदपत्रे परत मिळवून देण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

छावा – अन्यायाविरुद्ध आवाज…

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *