कर्तव्य बजावताना माणुसकीही जपली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग पोलिसांचे रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन
छावा डिजिटल न्यूज मीडिया |सचिन मयेकर _शुक्रवार , दि. २५ सप्टेंबर २०२६
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या अलिबाग पोलिसांनी आपल्या कर्तव्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत कौतुकास्पद उपक्रम राबवला. अलिबाग पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. गणेशोत्सवाच्या काळात बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत असतानाच पोलिसांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत या उपक्रमात सहभाग घेतला. एक रक्तदान म्हणजे केवळ रक्तदान नसून एखाद्या गरजू रुग्णाच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे काम आहे. पोलिसांच्या या उपक्रमातून कर्तव्याबरोबरच समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि माणुसकीची भावना अधोरेखित झाली असून, ‘वर्दीतील कर्तव्य आणि मनातील माणुसकी’ असा प्रेरणादायी संदेश या रक्तदान शिबिरातून समाजासमोर आला.
![]()

