वर्दीतला “सिंघम” भक्तीच्या रंगात हर्षद हिंगे साहेबांच्या घरी विराजमान गणराया गणरायाच्या चरणी सुख-समृद्धीची प्रार्थना
कर्तव्य बजावताना कठोर भूमिका घेणारे, कायदा-सुव्यवस्थेसाठी सदैव तत्पर असलेले हर्षद दर्शना सुनिल हिंगे साहेब गणरायाच्या भक्तीत मात्र अगदी मनोभावे तल्लीन झालेले पाहायला मिळतात.
छावा डिजिटल न्यूज मीडिया |सचिन मयेकर _शुक्रवार , दि. २५ सप्टेंबर २०२६
हर्षद हिंगे साहेबांच्या घरी यंदा आकर्षक सजावटीत गणरायाचे आगमन झाले असून, फुलांची आकर्षक आरास, विद्युत रोषणाई आणि भक्तिमय वातावरणाने घरातील गणेशोत्सवाला विशेष रंगत आली आहे. कुटुंबीयांसमवेत गणरायाची आरती आणि पूजा करताना हिंगे साहेबांनी भक्तिभावाने बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला.
गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना त्यांनी आपल्या कुटुंबासह सर्वांच्या सुख-समृद्धीची, आरोग्याची आणि यशाची मनोकामना केली.
गणराया, संकटांवर मात करण्याची शक्ती दे…
कर्तव्य बजावताना प्रामाणिक राहण्याचे बळ दे…
आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समाधान नांदू दे.
हर्षद हिंगे साहेबांच्या घरचा गणराया—भक्ती, संस्कार आणि कुटुंबाच्या प्रेमाचा सुंदर संगम
छावा परिवारातर्फे हर्षद हिंगे साहेब व त्यांच्या परिवाराला गणरायाच्या हार्दिक शुभेच्छा🌺
गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया… 🚩

![]()

