जय हनुमान ज्ञान गुण सागर… रेवदंड्यातील पुरातन मारुती मंदिराच्या गावकीच्या सप्ताहाची पालखी सोहळ्याने सांगता

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | रेवदंडा — दि. 0१ सप्टेंबर २०२६

 रेवदंड्यातील पारनाका येथील पुरातन श्री. मारुती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या गावकीच्या सप्ताहाची सांगता मारुतीरायाच्या पालखी सोहळ्याने मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात करण्यात आली.

जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहुँ लोक उजागर

मोठ्या भक्तिमय वातावरणात आठवडाभर सुरू असलेल्या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली. सप्ताहाच्या निमित्ताने मंदिरात रात्रंदिवस अखंड भजनाचे प्रहर रंगले होते. विविध भजनी मंडळांनी सादर केलेल्या सुश्राव्य भजनांनी, भक्तिगीतांनी संपूर्ण रेवदंडा गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. आठ दिवस मंदिर परिसरात चैतन्याचे आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

सप्ताहाच्या सांगतेनिमित्त मारुतीरायाची आकर्षक पालखी सजविण्यात आली होती. या पालखी सोहळ्यात रेवदंड्यासह परिसरातील ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा, खालुबाजा चा गजर, लेझिम पथक, भजनांचे सूर आणि मारुतीरायाचा जयघोष करीत पालखी गावातील विविध भागांतून फिरविण्यात आली.

पालखी आपल्या दारी येताच भाविकांनी मोठ्या श्रद्धेने मारुतीरायाचे दर्शन घेतले. अनेकांनी पालखीचे पूजन करून आरती केली आणि मारुतीरायाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत ग्रामस्थांनी या भक्तिमय सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

गावकीच्या सप्ताहाच्या निमित्ताने आठ दिवस सुरू असलेल्या अखंड भजन-कीर्तनामुळे संपूर्ण गावात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. पारनाका येथील पुरातन मारुती मंदिराची धार्मिक परंपरा आणि ग्रामस्थांची श्रद्धा यांचा सुमारे सव्वाशे वर्षांची ही साप्ताह व पालखीची प्रथा सर्वाना अनुभवास मिळाली.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *