को. ए.सो. सोसायटी शाळेचे CEO विनायक खोपकर यांचा मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे सत्कार
सचिन मयेकर | ९ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया
को. ए. सो. सोसायटी शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. विनायक खोपकर हे सेवानिवृत्त झाल्यानिमित्त त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करत मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
श्री. विनायक खोपकर यांनी आपल्या सेवाकाळात शैक्षणिक क्षेत्रात जबाबदारीने व प्रामाणिकपणे योगदान दिले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येत त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी उपस्थितांनी श्री. खोपकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि सुख-समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या.
दररोजच्या मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून निर्माण झालेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून आयोजित करण्यात आलेला हा सत्कार सोहळा भावनिक आणि आपुलकीचा ठरला.
![]()

