भरधाव दुचाकीचा भीषण अंत वळणावर ताबा सुटला १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

छावा न्यूज –२ जुलै | सचिन मयेकर, सूडकोली 

अलिबाग-रोहा मार्गावरील सुडकोली गावाच्या हद्दीत गुरुवारी (दि. २ जुलै) झालेल्या भीषण दुचाकी अपघातात १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर गणेश पवार (वय २२, रा. पाटण सही आदिवासीवाडी, ता. रोहा) हा त्याची मैत्रीण वृषाली अंकुश वाघमारे (वय १८, रा. तासगाव आदिवासीवाडी, ता. मुरुड) हिला एमएच-०६-सीआर-०२९५ क्रमांकाच्या यामाहा दुचाकीवरून अलिबाग-रोहा मार्गाने घेऊन जात होता. सुडकोली गावाजवळील धोकादायक वळणावर दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट रस्त्याखालील ओहळात कोसळली. या भीषण अपघातात ईश्वर पवार याचा डावा पाय फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला. तर त्याच्यासोबत प्रवास करणारी वृषाली वाघमारे हिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित शिवाजीराव गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस करीत आहेत.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *