रेवदंड्यात चोरट्यांचा धुमाकूळ दोन बंद ब्लॉकचे कुलूप फोडले, तिसऱ्या ब्लॉकचे कुलूप फोडण्याचा प्रयत्न

छावा न्यूज –१ जुलै | सचिन मयेकर, रेवदंडा

 रेवदंडा येथील गणपती आळी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत चोरीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी दोन बंद ब्लॉकचे कुलूप फोडून घरातील सामान अस्ताव्यस्त केले. मात्र, दोन्ही ब्लॉकमधून कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेली नसल्याची माहिती मिळाली आहे. याच ठिकाणी चोरट्यांनी तिसऱ्या ब्लॉकचे कुलूप फोडण्याचाही प्रयत्न केला; मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. काही दिवसांपूर्वी सुमारे आठ दिवसांपूर्वी आगरकोट किल्ला परिसरात चोरीची घटना घडली होती. त्या वेळी अज्ञात चोरट्यांनी सुमारे काही रुपयांची रोकड लंपास केली असल्याची चर्चा होती. सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

 सावधान…तुमची एक सोशल मीडिया पोस्ट              चोरट्यांसाठी ठरू शकते ‘निमंत्रण’

आजकाल अनेकजण कुटुंबासह फिरायला, सहलीला किंवा गावाबाहेर जाताना “Way to Goa”, “Way to Mahabaleshwar”, “Vacation Mode” अशा पोस्ट, स्टेटस किंवा रील्स फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर तात्काळ शेअर करतात. अशा पोस्टमधून घर बंद असल्याची माहिती चोरट्यांपर्यंत सहज पोहोचू शकते. त्याचा गैरफायदा घेत चोरटे बंद घरांना लक्ष्य करू शकतात. म्हणूनच प्रवासाची माहिती किंवा आपले थेट लोकेशन सोशल मीडियावर तात्काळ शेअर करू नका. प्रवास पूर्ण झाल्यानंतरच फोटो किंवा पोस्ट प्रसिद्ध करा. तुमची एक छोटी सावधगिरी मोठी चोरी टाळू शकते..

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *