रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत धक्कादायक प्रकार अल्पवयीन मुलीवर अत्याचार – एकावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड – सचिन मयेकर | दि. १५ जून २०२६

रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना घडली आहे, मुरुड तालुक्यातील तेंबुर्डे आदिवासीवाडी येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला दिनांक 01/11/2025 रोजी मध्यरात्री 12 वाजता तिच्याच गावातून आरोपीने विश्वासात घेऊन सोबत नेले, लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली आणि नोव्हेंबर 2025 पासून वारंवार तिचा गैरफायदा घेतल्याने ती गरोदर राहिली आहे, या धक्कादायक प्रकाराची तक्रार पीडित मुलीने दिल्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 86/2026 नोंदवण्यात आला आहे, या गुन्ह्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा 2012 चे कलम 4, 5(j)(2), 6 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(d), 65 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे, या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद मडावी यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत, या घटनेनें परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *