सु ए सो माध्यमिक विद्यालय कुरुळचा दणदणीत निकाल; SSC परीक्षेत ९५% यश

छावा डिजिटल मीडिया – कुरूळ — राजेश बाष्टे – दिनांक १५  मे २०२६

कुरुळ येथील सु ए सो माध्यमिक विद्यालयाचा फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल तब्बल ९५ टक्के लागला आहे. शाळेतील एकूण २० विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निकालामध्ये तीन विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी, पाच विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर सात विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली आहे. तसेच चार विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.

 प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे :

 प्रथम – चिन्मयी ज्योती अजित पाटील — ८३.४०%

 द्वितीय – पायल जया अनिल घोरपडे — ८२.००%

 तृतीय – निशा सुमित्रा युवराज राठोड — ७७.८०%

विशेष म्हणजे, कुरुळ येथील या माध्यमिक विद्यालयात बहुसंख्य अमराठी विद्यार्थी शिक्षण घेत असूनही शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास हे महत्त्वाचे घटक असल्याचे बोलले जात आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे चेअरमन ॲड. प्रसाद पाटील तसेच मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *