शेर अकेला आता है …सुअर झुंड मे आते है..इतिहास त्याचाच घडतो जो जगाला हादरवण्याची ताकत ठेवतो… असा हा आपला राजा “छावा” ‘संभाजी शिवाजी भोसले’ ज्याच्या नावानें औरंगजेब… सिद्दी… पोर्तुगीज… आणि ब्रिटिशांचा थरकाप उडाला होता..

छावा डिजिटल मीडिया – रेवदंडा  — दिनांक १४ मे २०२६

१४ मे १६५७… पुरंदरच्या मातीत एक सिंव्हाचा छावा जन्माला आला…आणि पुढे त्याच ‘छावा’नें औरंगजेबाच्या लाखोंच्या साम्राज्याला गुडघ्यावर आणलं.तो राजा फक्त सिंहासनावर बसणारा नव्हता…तो रणांगणात तलवार घेऊन आघाडीवर लढणारा राजा होता.

ते होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ‘छावा’

इतिहासात अनेक राजे झाले पण एकाचवेळी मुघल, पोर्तुगीज, ब्रिटिश आणि सिद्दी या चार महासत्तांना उघड आव्हान देण्याची हिंमत फक्त शंभूराजांनी दाखवली.१७ व्या शतकातील जगप्रसिद्ध ‘द लंडन गॅझेट’ या वृत्तपत्रालाही त्यांच्या पराक्रमाची दखल घ्यावी लागली.

            सचिन मयेकर            

ही साधी गोष्ट नव्हती… त्या काळी ज्याची बातमी लंडनपर्यंत पोहोचायची, तो राजा किती भयंकर असेल याची कल्पनाच केलेली बरी.. गोव्यावर केलेल्या मराठ्यांच्या विजेच्या वेगाने हल्ल्यांमुळे पोर्तुगीज अक्षरशः हादरले होते.शंभूराजांच्या सैन्याचा धडाका इतका जबरदस्त होता की, पोर्तुगीजांनी स्वतःच्या संरक्षणासाठी औरंगजेबाकडे मदत मागितल्याचे उल्लेख परकीय दस्तऐवजांत सापडतात.एकीकडे औरंगजेब… दुसरीकडे सिद्दी… समुद्रात पोर्तुगीज… आणि ब्रिटिशांची कारस्थाने…पण शंभूराजे कुठेही झुकले नाहीत.कारण त्यांच्यात शिवरायांचं रक्त होतं…आणि छातीत भगव्या स्वराज्याची आग धगधगत होती.

शेर अकेला आता है..हे वाक्य शंभूराजांवर तंतोतंत लागू पडतं

 

ज्यावेळी सगळे परकीय एकत्र येऊन मराठ्यांना संपवण्याचं स्वप्न पाहत होते… त्यावेळी एक मराठा राजा एकटाच त्यांच्या छाताडावर उभा राहिला होता. शंभूराजांनी रणांगणात तलवारीने लढाई जिंकली…आणि छळ सहन करून धर्म न सोडता इतिहास जिंकला.डोळे काढले…जिभ कापली…अमानुष छळ केला…पण औरंगजेबाला एकदाही “मी हारलो” हे शब्द ऐकायला मिळाले नाहीत.  कारण तो साधा राजा नव्हता… तो हिंदवी स्वराज्याचा जिवंत ज्वालामुखी होता.आजही महाराष्ट्राच्या मातीत “जय शंभूराजे”चा नारा घुमला की अंगावर शहारे येतात… कारण हा इतिहास फक्त वाचायचा नाही…तो रक्तात उतरवायचा असतो.

 “जग जिंकणारे अनेक झाले…

पण स्वतःचा धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्य वाचवण्यासाठी मृत्यूला हसत सामोरं जाणारा राजा एकच — धर्मवीर संभाजी महाराज.

शंभूराजे म्हणजे मराठी अस्मितेचा जाज्वल्य ज्वालामुखी.

अशा या स्वाभिमानी, शूर आणि तेजस्वी राजाला जन्मदिनी त्रिवार मानाचा मुजरा.. जन्म : १४ मे १६५७  दुर्गराज किल्ले पुरंदर..

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *