आरसीएफ एक्स एम्प्लाॅईज सोशल फोरम थळ ची मासिक सभा संपन्न
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, अलिबाग ५ एप्रिल २०२६
रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी आरसीएफ कॉलनी कुरुळ येथील गणेश मंदिरामध्ये मासिक सभा पार पडली. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून जे एस एम कॉलेज, अलिबाग चे सेवानिवृत्त प्राध्यापक श्री श्याम जोगळेकर हे सपत्नीक उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली त्यानंतर सचिव श्री श्रीनिवास पाटील यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले, वाढदिवस असलेल्या सभासदांचे अभिष्टचिंतन व नवीन सभासदांचे स्वागत झाले. अध्यक्ष श्री रवींद्र वर्तक यांनी पेन्शन केस तसेच मेडिकल बिल संबंधी झालेल्या प्रगतीची उपस्थित सभासदांना माहिती सांगितली. श्री अभिमन्यू पाटील यांनी एलआयसी पेन्शन हयातीचा फॉर्म वाटपा संबंधी माहिती दिली. श्री रमेश म्हात्रे यांचे हस्ते प्रमुख व्याख्याते श्री श्याम जोगळेकर सर यांना पुष्पगुच्छ देण्यात आला तर डॉ. जी टी पाटील यांच्या हस्ते शाल देऊन प्रोफेसर जोगळेकर यांचा सत्कार करण्यात आला. सौ जोगळेकर यांचा सुद्धा श्रीमती स्मिता अधिकारी यांचे हस्ते पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष श्री विष्णू बापट यांनी प्रोफेसर जोगळेकर यांची थोडक्यात ओळख करून दिली व त्यानंतर जोगळेकर सर यांनी आपल्या खास शैलीमध्ये मार्गदर्शनपर भाषण केले.
अलिबाग – राजेश बाष्टे.
यामध्ये त्यांनी इंग्रजी लेखक मॅक्झिम गॉर्की यांच्या काही पंक्तींचे वाचन करून ते आता कसे आपल्या सर्वांना लागू आहे हे स्पष्ट केले. आपण कुठे जन्माला यायचे, कुठले नाव लावायचे , कुठले आडनाव लावायचे हे आपल्या हातात नसते व आपण नंतर आपले व्यक्तिमत्व स्वतःच घडवायचे असते. सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या पती-पत्नींनी एकमेकांची साथ द्यायची असते याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला . त्यांचे भाषण हा एक प्रकारे उपस्थित श्रोत्यांशी संवादच होता. त्यामुळे एकंदरीतच हलकेफुलके वातावरण राहिले व याचा सर्व उपस्थित सभासदांनी मनापासून आनंद घेतला. कार्यक्रमाचे शेवटी श्री सुधीर सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. श्री रमेश म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्री श्रीनाथ कवळे यांनी कार्यक्रमाचे सुंदर छायाचित्रांकन केले .त्यानंतर गणेश आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास 156 सभासद उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मंगेश भगत श्री विलास घरत श्री विनोद गांधी श्री अरुण मोरे श्री राजन कुलकर्णी श्री शरद पाटील श्री अनंत भिडे श्री शरद देशमुख श्री सूर्यकांत पाटील श्री श्रीनाथ कवळे , श्री अजित नाईक श्री जीवन जोशी यांनी मोलाची मदत केली.
![]()

