पीएनपीच्या विद्यार्थिनी राज्यात अव्वल पीएनपी होली चाईल्ड स्कूलच्या विद्यार्थिनी ठरल्या ITO परीक्षेत राज्यात अव्वल
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, बुधवार ०१ एप्रिल २०२६
अलिबाग तालुक्यातील पीएनपी होली चाईल्ड सी.बी.एस.ई. वेश्वी स्कूलमधील विद्यार्थिनी इंडियन टॅलेंट ओलिंपियाड ( Indian Talent Olympiad ) ( ITO ) इंग्रजी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा नावलौकिकात भर घातली आहे.
इयत्ता तिसरीतील सान्वी पटेल हिने दुसऱ्या फेरीत राज्यस्तरावर पाचवा क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली, तर इयत्ता पहिलीतील वीरा फार्णे हिने तिसरा क्रमांक मिळवून राज्यात आपले स्थान निर्माण केले आहे. या दोन्ही विद्यार्थिनींनी राज्यात टॉपर म्हणून मानाचा किताब पटकावत शिष्यवृत्तीही मिळवली आहे.
राजेश बाष्टे — अलिबाग
विद्यार्थिनींच्या या यशामागे त्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. इंग्रजी विषयातील उत्कृष्ट प्रावीण्यामुळे त्यांनी ही कामगिरी साध्य केली आहे, त्यांच्या या यशामुळे संपूर्ण शाळेचा अभिमान वाढला असून, शिक्षकवृंद व पालकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, उपमुख्याध्यापिका सदाफ शहाबाजकर, यांनी उल्लेखनीय कामगिरीबद्दल दोघींचे अभिनंदन केले. सान्वी पटेल आणि वीरा फार्णे यांच्या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
![]()

