अलिबागमध्ये तालुक्यात २ शाळा अनधिकृत; रायगडमध्ये ३५ शाळांवर कारवाईची टांगती तलवार!
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, अलिबाग,शुक्रवार २६ मार्च २०२६
अलिबाग तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात धक्कादायक बाब समोर आली असून, तालुक्यातील 2 शाळांना ‘अनधिकृत’ घोषित करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यादीत या शाळांचा समावेश असून, पालकांनी आपल्या पाल्यांचे भविष्य धोक्यात घालू नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाभरात एकूण 35 अनधिकृत शाळा आढळून आल्या असून, त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील खालील दोन शाळांचा समावेश आहे:
👉 ज्ञानार्जन प्रि-प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल (बोडणी)
👉 एमएसटी इंटरनॅशनल स्कूल (बोडणी)
प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहीतुळे यांनी पालकांना इशारा देत सांगितले की, शासनाची मान्यता नसलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.
⚠️ आरटीई अंतर्गत कारवाईचे संकेत
शासनाची मान्यता न घेता किंवा नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या शाळांवर आता आरटीई कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
📊 पनवेल तालुका सर्वाधिक पुढे
जिल्ह्यातील आकडेवारीनुसार, पनवेल तालुक्यात सर्वाधिक 22 अनधिकृत शाळा आढळल्या असून, इतर तालुक्यांमध्येही ही संख्या चिंताजनक आहे.
📋 रायगड जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची संपूर्ण यादी
🔴 पनवेल (22)
आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल (विचुंबे), न्यू इंग्लिश स्कूल (नेरे), एसजीटी इंटरनॅशनल स्कूल (करंजाडे), बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल (करंजाडे), वेदिक ट्री इंटरनॅशनल स्कूल (करंजाडे), दि वृद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल (ओवळे-दापोली), सनराईज इंग्लिश स्कूल (वावंजे), लक्ष्मण अर्जुन पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल (वावंजे), नवजीवन इंटरनॅशनल स्कूल (खारपाडा), सेंट ग्रेगोरियस हायस्कूल (शिरढोणपाडा), आक्सफोर्ड इंग्लिश स्कूल (कळंबोली), मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल (ओवे), काळसेकर इंग्लिश मिडीयम स्कूल (पाचनंद), अर्कम इंग्लिश स्कूल (तळोजा), द वेस्ट हिल इंटरनॅशनल स्कूल (तळोजा), ओशियन ब्राईट कॉन्वेंट हायस्कूल (तळोजा), रोहिंजण इंग्लिश स्कूल, बजाज इंटरनॅशनल स्कूल (तळोजा), राईजिंग इंटरनॅशनल स्कूल (कोपर-उलवे), एसएमबी इंटरनॅशनल स्कूल (उलवे), शाहीर बाळाराम पाटील इंग्लिश स्कूल (शेडुंग), लक्ष्मी पब्लिक स्कूल (सांगडे).
🔴 श्रीवर्धन (3)
किड्स पॅरेडाईस प्रि-स्कूल (आराठी), इंपेरिअल स्कूल (अयार मोहल्ला), अंजुमन इस्लाम जंजिरा (रानवली).
🔴 म्हसळा (3)
अल इहसान इंग्लिश स्कूल, इतकान इंग्लिश स्कूल (गोंडघर), ए.आर. उंड्रे इंग्लिश स्कूल (मेंदडी).
🔴 खालापूर (2)
सेंट मेरी स्कूल (कोपरी), भारती अॅकेडमी अॅण्ड ज्युनियर कॉलेज (खोपोली).
🔴 अलिबाग (2)
ज्ञानार्जन प्रि-प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल (बोडणी), एमएसटी इंटरनॅशनल स्कूल (बोडणी).
🔴 कर्जत (1)
सेंट औरा ई-टेक्नो स्कूल (बांधिवली).
🔴 उरण (1)
नागराज स्कूल (बोरी).
🔴 महाड (1)
लिटील एंजल स्कूल (पानसरी मोहल्ला).
🚨 पालकांनो सावधान!
शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे कोणत्याही शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी तिची शासकीय मान्यता तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
![]()

