रायगड पोलीसांचा अभिमान खो-खो स्पर्धेत रजत पदकाची कमाई
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा गुरुवार २६ मार्च २०२६
जम्मू-काश्मीर येथे पार पडलेल्या २ री अखिल भारतीय पोलीस क्रीडा क्लस्टर स्पर्धा २०२५-२०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत रायगड जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.
या स्पर्धेतील खो-खो क्रीडा प्रकारात रायगड जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई शनिराज हारगे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावून रजत पदकाची कमाई केली.
या यशाबद्दल त्यांचा सन्मान पोलीस अधीक्षक मा. ऑंचल दलाल मॅडम (अलिबाग-रायगड) यांच्या हस्ते करण्यात आला.
मार्गदर्शनामुळे यशाची उंच झेप
या यशामागे पोलीस हवालदार ऋषिकेश साखरकर (स्पोर्ट्स इन्चार्ज, रायगड) यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले.
त्यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंना योग्य प्रशिक्षण मिळाले आणि त्यातूनच हा अभिमानास्पद निकाल साध्य झाला.
जिल्ह्याचा गौरव
शनिराज हारगे यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण रायगड जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
👉 मैदानावर घाम गाळणाऱ्याच हातात पदक चमकतं… रायगड पोलीसांनी पुन्हा एकदा ते सिद्ध करून दाखवलं…
![]()

