फटाक्यांच्या आतषबाजीत नागावमध्ये जल्लोष, रेवदंड्यात बेंजोच्या तालावर आनंदोत्सव; जिल्हा परिषदेसाठी सचिन राऊळ तर पंचायत समितीसाठी शरद गोंधळी विजयी
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍रेवदंडा – सचिन मयेकर
- 📅 सोमवार , 9 फेब्रुवारी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर होताच परिसरात जल्लोषाला उधाण आले. मतदारांनी आपला कौल स्पष्ट देत जिल्हा परिषदेसाठी सचिन शरद राऊळ आणि पंचायत समितीसाठी शरद पांडुरंग गोंधळी यांना विजयी केले असून, निकालानंतर नागाव आणि रेवदंडा परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
जिल्हा परिषदेसाठी सचिन शरद राऊळ यांचा दणदणीत विजय

३५ चौल जिल्हा परिषद मतदारसंघातून सचिन शरद राऊळ यांनी १०,१९६ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला. मतमोजणी पूर्ण होताच निकाल स्पष्ट झाला आणि समर्थकांमध्ये उत्साहाची लाट उसळली. स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका, सामाजिक कामाचा अनुभव आणि जनतेशी थेट संपर्क यामुळे मोठा जनसमर्थन मिळाल्याची चर्चा दिसून आली.
पंचायत समितीसाठी शरद पांडुरंग गोंधळी यांचा निर्णायक विजय

६९ रेवदंडा पंचायत समिती गणातून शरद पांडुरंग गोंधळी यांनी ३,८१५ मते मिळवत विजय मिळवला. चुरशीच्या लढतीत मिळालेल्या या यशामुळे रेवदंड्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ओळख असलेल्या शरद गोंधळी यांच्या सामाजिक कार्याची पावती मतदारांनी दिल्याचे बोलले जात आहे.
नागावमध्ये फटाक्यांची आतषबाजी, रेवदंड्यात बेंजोच्या तालावर जल्लोष
निकाल जाहीर होताच नागावमध्ये फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. तर रेवदंड्यात बेंजोच्या तालावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. गुलाल, घोषणाबाजी आणि जल्लोषामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. समर्थकांनी एकत्र येत विजयाचा आनंद व्यक्त केला.
मतदारांनी दिलेल्या स्पष्ट कौलामुळे जिल्हा परिषदेसाठी सचिन शरद राऊळ आणि पंचायत समितीसाठी शरद पांडुरंग गोंधळी यांचा हा विजय जनतेच्या विश्वासाचे प्रतीक मानला जात असून, निकालानंतर परिसरात दिवसभर विजयाची चर्चा सुरू होती.
सामाजिक काम आणि आधी लिहिलेला सविस्तर लेख येथे वाचा 👇” फोटोवर क्लिक करा
रेवदंडा–चौल : सामाजिक कामातून पुढे आलेली स्थानिक व्यक्तिमत्त्वे
![]()

