सर्वर स्लोचा फटका! अलिबाग पोस्ट ऑफिसमध्ये स्पीड पोस्ट सेवा ठप्प; नागरिकांना प्रतीक्षेचा त्रास
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 बुधवार , ४ फेब्रुवारी २६
अलिबाग – शहरातील अलिबाग पोस्ट ऑफिस येथे आज सकाळपासून सर्वर स्लो असल्याने स्पीड पोस्टसह इतर टपाल सेवा विस्कळीत झाल्या. त्यामुळे टपाल पाठवण्यासाठी आलेल्या नागरिकांना दीर्घ वेळ प्रतीक्षा करावी लागली.
सकाळपासूनच पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येत होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे स्पीड पोस्ट स्वीकारता येत नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे अनेकांची कामे रखडली, तर काहींना काम न होता परत फिरावे लागले.
स्पर्धा परीक्षा, शासकीय व न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे वेळेत पाठवता न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. “स्पीड पोस्ट असूनही वेळेत सेवा मिळत नसल्याने गैरसोय होत आहे,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.
दरम्यान, सर्वरमधील तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतरच सेवा सुरळीत होईल, असे पोस्ट ऑफिसकडून सांगण्यात आले. सार्वजनिक सेवांमध्ये अशा तांत्रिक अडचणी वारंवार उद्भवू नयेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
![]()

