छावा FILMFARE शुक्रवार विशेष— फुटपाथचे दिवस ते मन्नतचे दरवाजे स्वप्नांचा खरा बादशाह शाहरुख

  • छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍️ सचिन मयेकर
  • 📅 शुक्रवार , २ जानेवारी २६

मुंबईच्या त्या समुद्रकिनारी उभा असलेला मन्नत अनेक वादळे पाहत आला आहे फक्त बाहेरचे नाही तर आतलेही कारण जीवन नेहमी हिर्‍यासारखे चमकत नाही कधी कोळशासारखे दाबतेही शाहरुखच्या आयुष्यातही एक काळ आला जेव्हा स्क्रीनवर सलग फ्लॉप्स पडले लोक म्हणायला लागले त्याचा काळ संपला नवे हिरो आले OTTचे वारे आले सिनेमा बदलला नवीन चेहरे उभे राहिले आणि काहींचा आवाज उठला की शाहरुख आता जुना झाला पण तो शांत होता मनात वादळ चालू होतं बाहेर चेहरा शांत आणि सभ्य पण आत कष्टाची आग कायम

याच काळात त्याच्या कुटुंबावर काळोख आला आर्यनवर प्रकरण नोंदले गेले संपूर्ण देश चर्चा करू लागला मीडिया धावत आला सोशल मीडियावर वादळ उठलं काहींनी न्याय मागितला काहींनी पाठीमागून काटे टोचले तो बाप होता त्याच्या हृदयात तलवार फिरत होती पण चेहऱ्यावर शब्द नव्हते किती रात्री तो खिडकीतून समुद्राकडे पाहत राहिला असेल मुलगा तुरुंगात होता बाप घरात पण श्वास जखमा घेऊन चालत होता त्या क्षणी तो स्टार नव्हता तो सामान्य बापच होता पावसासारख्या दुखावलेल्या डोळ्यांनी जगाचा गोंगाट थंडपणे ऐकला किती शक्ती पाहिजे हे सहन करायला पण आत्मा हार मानला नाही न्याय मिळाला आणि ते वादळही निघून गेलं

लोक समजतात स्टारला काही होत नाही त्याच्या घरात पैशाची कमी नसते नाव आहे कीर्ती आहे पण दुखापण माणसाचं असतं ना स्टेजच्या मागे तोही रक्त मांसचा आणि त्या काळात त्याने स्वतःला बांधून ठेवलं आवाज न वाढवता भांडण न करता शांतपणे परिस्थिती पार केली आणि एक दिवस परत उभा राहिला जसा सिंह जखमांवर मीठ लावून पुन्हा गर्जतो

मग आला पठाण हा फक्त चित्रपट नव्हता तो पुनर्जन्म होता शाहरुखच्या आयुष्याचा परत येणं नव्हतं हे तर परत ताबा मिळवणं होतं थिएटरमध्ये लोक उभे उभे टाळ्या पिटत होते सीट फाडून शिव्या प्रेमातल्या ओरडासारख्या हवेत उडत होत्या पुन्हा जग म्हणालं किंग इज बॅक पठाणच्या पोस्टर्सवर लायनी थिएटर हाऊसफुल्ल परदेशात मोठ्या कलेक्शनचे रेकॉर्ड बॉक्स ऑफिस तोडले आणि त्याचं एक वाक्य पुन्हा जिवंत झालं जर फिल्म फ्लॉप हो गई तो भी आप लोग शाहरुख को हारा हुआ नहीं कह सकते

मग जवान आला आणि इतिहास पुन्हा बदलला थिएटरमध्ये गर्दी उसळली युवान्याने ज्वाला पेटल्या भारतभर त्याच्या नावाने उद्घोष झाला जवानने शाहरुखला फक्त परत आणलं नाही तर सिंहासनावर बसवलं जीवन कधीकधी अशा कहाण्या लिहितं की जग आश्चर्यचकित होतं की पडलेला योद्धा पुन्हा तलवार उचलतो आणि युद्ध जिंकतो हा अभिनेता नाही हा धडा आहे की तुटलं तरी पुन्हा जोडता येतं हरलं तरी पुन्हा खेळता येतं आणि जे परत येतात तेच बादशाह असतात

बॉलिवूडच्या झगमगाटी दुनियेत जिथे नाती क्षणात जुळतात आणि तुटतात तिथे शाहरुख खान मात्र अपवाद ठरतो, आयुष्यभर त्याने एकच पत्नी, एकच प्रेम आणि एकच संसार जपला, कॉलेजच्या दिवसांत भेटलेली गौरी त्याच्या संघर्षातही सोबत होती आणि यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही त्याच हातात हात घालून उभी राहिली, प्रसिद्धी वाढली, पैसा आला, नाव मोठं झालं तरी नात्याची किंमत त्याने कधी कमी केली नाही, अनेक कलाकारांच्या आयुष्यात वादळं आली पण शाहरुखने कुटुंबाला किल्ल्यासारखं जपलं, पत्नीवरचा विश्वास आणि नात्यावरील निष्ठा हीच त्याची खरी ओळख ठरली आणि म्हणूनच लोक म्हणतात की शाहरुख फक्त पडद्यावरचा रोमँटिक हिरो नाही तर खऱ्या आयुष्यातही तो एकपत्नीव्रताचा आदर्श आहे.

आज शाहरुख लाखो लोकांच्या हृदयात राहतो हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सीमांची गरज नाही धर्माची भिंत नाही त्याच्या नावावर प्रेम एक होतं कारण तो धर्मापेक्षा मोठं काही देतो तो आशा देतो कि स्वप्नं पाहा संघर्ष करा मेहनत करा आणि एक दिवस तुमची मन्नतही फळेल हा मुलगा दिल्लीच्या गल्लीतील स्वप्नांनी मोठा झाला आणि मुंबईच्या आकाशात तारा बनून चमकतो आजही रात्री मन्नतसमोर उभं राहून लोक म्हणतात कधी ना कधी माझीही वाट उघडेल

शाहरुखची गोष्ट इथे संपत नाही कारण त्याचं नाव पुस्तक नाही ते नदी आहे ती वाहतेच राहते कोणतीही अडथळा आला तरी दिशा बदलते पण थांबत नाही म्हणूनच मन्नत फक्त घर नाही ते धडधडणारं स्वप्न आहे जे जगाला शिकवतं की गरीब मुलगाही साम्राज्य बनवू शकतो फक्त थांबू नये ढासळू नये तिथून उठावं पुन्हा चालत जावं आणि शेवटपर्यंत लढत राहावं

ही कथा मनात ठेवा आणि दरवेळी अडचण आली तर मन्नतकडे पाहा आणि स्वतःला सांगा शक्य आहे कारण शाहरुखच्या वाटेवर काटे होते पण आज त्याच मार्गावर गुलाब फुलतात कारण त्याने लढलं आणि जिंकलं म्हणून झोपडीतून मन्नतपर्यंतचा हा प्रवास सम्राटाचा आहे स्वप्नांचा आहे आणि साक्ष आहे कि कष्टाच्या मुट्ठीतून इतिहास जन्मतो

वाचत रहा छावा

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *