पालकांनो सावधान! तुमचं मूल शाळेत सुरक्षित आहे का? राज्य सरकारची मोठी कारवाई – १ ते १८ डिसेंबर दरम्यान सर्व शाळांची धडक तपासणी
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – PTI – सोमवार ०८ डिसेंबर २०२५
पालकांनो तुमचं मूल शाळेत सुरक्षित आहे का राज्य सरकारची मोठी कारवाई १ ते १८ डिसेंबरदरम्यान पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळांची अचानक धडक तपासणी कागदोपत्री दाखवलेल्या सुरक्षेच्या दाव्यांची प्रत्यक्षात होणार कसून चाचणी नियमभंग आढळल्यास शाळांना तत्काळ आदेश आणि कारवाईचा इशारा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य सुरक्षा उपाययोजनांवर शिक्षण विभागाचा लोहमोर्चागेल्या काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने राज्य हलले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले म्हणूनच आता शिक्षण विभागाने कडक भूमिका घेत सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अस्तित्वात आहेत का प्रवेश-निर्गमनावर नियंत्रण आहे का विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित आहे का कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी झाली आहे का मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत का शाळेला चारही बाजूंनी सुरक्षित कुंपण आणि प्रवेशद्वार आहे का चाइल्ड हेल्पलाइन 1098 चा उल्लेख स्पष्ट आहे का या सर्व गोष्टींची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे राज्यातील १ लाख ८ हजार शाळांना आदेश दिले होते आणि त्यातील अंदाजे ८८ हजार शाळांनी पोर्टलवर माहिती अपलोड केली आहे मात्र आता कागदावरील माहिती आणि प्रत्यक्षातील सुरक्षा या दोन वेगळ्या गोष्टी असल्याने शिक्षण विभागाच्या टीम शाळांवर अतिशय गोपनीय पद्धतीने अचानक धडक देणार आहेत त्रुटी सापडल्यास लगेच सुधारणा करावी लागणार नाहीतर कारवाई अनिवार्य असेल पिंपरी-चिंचवडमधील शाळांनी नियमांची नोंद पूर्ण केली असली तरी शिक्षण विभागाने कोणतीही तडजोड नाही असे स्पष्ट सांगितले आहे आणि बदलापूरच्या घटनेनंतर पालकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे कारण विद्यार्थ्यांची सुरक्षा म्हणजे भविष्यातील सुरक्षाच आहे आणि त्यावर कुठलाही तडजोडीचा सौदा होऊ शकत नाही अशी सरकारची ठाम भू१मिका
![]()

