
Category: महाराष्ट्र

तुरुंगातून बाहेर आले मुंबईचे “डॅडी” अरुण गवळी.
१७ वर्षांचा तुरुंगवास संपून सुप्रीम कोर्टाने दिला दिलासा मुंबईच्या अंडरवर्ल्डपासून ते विधानसभेच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाव – अरुण गवळी. कधी डॉन, तर कधी “डॅडी” म्हणून ओळखले जाणारे गवळी आता जवळपास १७ वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टाने ३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. सचिन मयेकर,‘छावा’ मुंबई ४…

हुजूर… मराठे आले!
मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणातून मराठ्यांचा हक्काचा लढा आणि न्यायालय-सरकारची भूमिका सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल -१ सप्टेंबर -मुंबई २०२५ आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून सुरू केलेल्या आमरण उपोषणाने महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे दिले आहेत. मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळावे, हीच त्यांची ठाम मागणी असून हा लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. जरांगे पाटलांच्या…

ज्येष्ठा गौरी आगमन : माहेरवाशीणीच्या आगमनाने घराघरांत आनंद
गणेशोत्सवाच्या मंगल वातावरणात आज घराघरांत ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले. गणरायाची जननी आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गौरींचं स्वागत भक्तांनी उत्साह, भक्तिभाव आणि पारंपरिक पद्धतीनं केलं. सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल ३१ ऑगस्ट २०२५ गौरी पूजनाची परंपरा महाराष्ट्रात शतकानुशतकं जोपासली जाते. “माहेरवाशीण घरी आल्यावर घरात सुख-समृद्धी नांदते” या श्रद्धेने गौरींचे आगमन आजही आनंदोत्सव मानलं जातं. आज आवाहन झाल्यानंतर…

पुण्याचा ग्रामदैवत कसबा गणपती जिजाऊंच्या संकल्पातून उभी राहिलेली परंपरा
इ.स. १६३० च्या सुमारास मुरार जगदेव या क्रूर करम्यान औरंगजेबाच्या आदेशावरून पुणं जाळून टाकलं. गाव उद्ध्वस्त झालं, देवळं नष्ट झाली, लोकांना पळ काढावा लागला. त्याच काळात पुणं म्हणजे जणू राखेचा ढिगारा झाला होता. सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल ३० ऑगस्ट २०२५ पुण्याचा मानाचा पहिला गणपती! जिजाऊ आईनी प्रतिष्ठापित केलेला कसबा गणपती पुण्याचेग्रामदैवत. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज…

रायगडमध्ये दोन महिन्यांसाठी ड्रोन वापरावर बंदी
रायगड जिल्ह्यातील संवेदनशील भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, दहशतवादी किंवा गुन्हेगारी कारवायांना आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वाचा आदेश काढला आहे. सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल २९ ऑगस्ट २०२५ पुढील दोन महिने पोलीस अधीक्षक रायगड यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचा ड्रोन कॅमेर्याचा वापर करण्यास पूर्वपरवानगीशिवाय सक्त मनाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या अहवालानुसार, धार्मिक स्थळे,…

चिखलामुळे भाविकांची पायपीट, पण भजनांनी विसर्जन सोहळा झाला भक्तिमय
आशुतोष केळकर, राजेश केळकर, मधुसूदन आठवले, घनश्याम शर्मा, नारायण शर्मा, निरज शर्मा, प्रशांत साने, यांनी टाळ-झांजांच्या गजरात अप्रतिम भजन-गाणी सादर केली. विशेष म्हणजे राजेश केळकर यांनी ढोलकीवर अफलातून साथ देत सर्वांची मने जिंकली. सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल २९ ऑगस्ट २०२५ दीड दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनावेळी समुद्रकिनारी चिखलामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागला. चिखलामुळे भाविकांना मोठे बंदर किनाऱ्यापर्यंत…

लहानग्याचे निरागस कुतूहल – बाप्पा परत घरी
आजच्या विसर्जनप्रसंगी भाविकांना चिखलामुळे मोठी पायपीट करावी लागली. अनेकांनी बाप्पाच्या विसर्जनासाठी किलोमीटर चालत मोठ्या मेहनतीने समुद्रकिनाऱ्यापर्यंत वाट काढली. या कठीण पायपिटीमध्ये एक हृदयस्पर्शी आणि कौतुकास्पद घटना घडली. सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल २८ ऑगस्ट २०२५ घरच्यांसोबत एक लहानगा मुलगाही आनंदाने विसर्जनाच्या यात्रेत सामील झाला होता. मोठ्या बाप्पाच्या मिरवणुकीत तो स्वतःच्या हातात एक छोटी बाप्पाची मूर्ती घेऊन चालला…

रेवदंड्यात दीड दिवसांच्या गणरायाला निरोप – चिखलामुळे भाविकांना मोठा पेचप्रसंग
रेवदंड्यात आज दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. मात्र या वेळी समुद्रकिनारी चिखल साचल्याने भाविकांना मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल २८ ऑगस्ट २०२५ ग्रामपंचायतीने केला चिखल काढण्याचा प्रयत्न,पोलिसांचे सहकार्य आणि समीर आठवले यांचा पुढाकार मारुती आली, विठोबा आली आणि परिसरातील सर्व गणेशमूर्ती पारनाका समुद्रकिनाऱ्याकडे निघाल्या. पण किनाऱ्यावरील चिखलामुळे विसर्जन करणे अवघड झाल्याने भाविकांना…

भामटा : पैशांची किंमत आणि सणाचा हृदयस्पर्शी धडा
भामटा एका छोट्या गावी भटकत गेला आणि एका घरात थांबला.घरात गणपती बाप्पा विराजमान झाले होते, पण वातावरण मात्र वेगळंच होतं. डोळ्यांत आनंद नव्हता, तर चिंता, दुःख आणि एक अढळ हुरहूर होती. सचिन मयेकर, संपादकीय ‘छावा’ पोर्टल २८ ऑगस्ट २०२५ खूप खूप वर्षांपूर्वी, भाद्रपद शुद्ध ते कुटुंब नुकत्याच झालेल्या मोठ्या दुःखातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतं—घरात…

आईचं मंगल दर्शन – घरच्या गणरायाचा खरा प्रसाद
गणराय घरी विराजमान झाला की प्रत्येक घराचं वातावरण पवित्र होतं. पण त्या मंगलमूर्तीसमोर आपल्या आईचं दर्शन झालं की तो क्षण अधिकच अद्वितीय ठरतो. कारण आई हीच खरी प्रथम देवता… तिच्या ओवाळण्याने, तिच्या प्रार्थनेनेच घराचा गणपती पूर्णत्वाला जातो. सचिन मयेकर, संपादकीय ‘छावा’ पोर्टल २७ ऑगस्ट २०२५ आई गणपतीसमोर उभी राहिली की तिच्या डोळ्यांतील भक्ती, तिच्या हातातील…