युवासेनेची अलिबाग विधानसभा कार्यकारिणी जाहीर हर्षल घरत यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

छावा डिजिटल न्यूज मीडिया ता.२३ नोव्हेंबर २६ सचिन मयेकर

युवासेना अलिबाग विधानसभा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, नव्या पदाधिकाऱ्यांवर संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये रेवदंड्याचे हर्षल घरत यांची अलिबाग विधानसभा जिल्हाध्यक्षपदी, तर निखिल तावडे यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य व विभागीय सचिव विकासशेठ गोगावले यांच्या आदेशानुसार ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख राजाभाई केणी आणि युवासेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव, सोशल मीडिया व कोकण विभागप्रमुख तसेच लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते उपस्थित होते.

नवनियुक्त प्रमुख पदाधिकारी पुढीलप्रमाणे :

१. अजय गायकर – लोकसभा उपाध्यक्ष (अलिबाग व पेण विधानसभा)

२. हर्षल घरत – जिल्हाध्यक्ष (अलिबाग विधानसभा)

३. निखिल तावडे – जिल्हा सचिव (अलिबाग विधानसभा)

४. स्वप्नील चव्हाण – जिल्हा समन्वयक (अलिबाग विधानसभा)

५. दिपेश वरणकर – जिल्हा उपाध्यक्ष (मुरुड तालुका)

६. संदेश थळे – तालुकाध्यक्ष (अलिबाग तालुका)

७. अमोल लाड – तालुकाध्यक्ष (मुरुड तालुका)

यांच्यासह तालुका सचिव, समन्वयक, उपतालुका पदाधिकारी तसेच अलिबाग आणि मुरुड शहर अध्यक्षांचीही नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून अलिबाग आणि मुरुड तालुक्यात युवासेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासह युवकांचे संघटन अधिक मजबूत करण्याचे आव्हान नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…

छावा | निर्भीड पत्रकारिता, जनतेचा आवाज

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *