रेवदंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन अकस्मात मृत्यू; एकाचा सर्पदंशाने मृत्यू

सचिन मयेकर | ११ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया

रेवदंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र अकस्मात मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत मयत वय वर्षे ५७ रा. वेळवली पोस्ट नागाव परिसरातील एका व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी खाजगी वाहनाने अलिबाग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची रेवदंडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक २८/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे तपास सुरू आहे. दुसऱ्या घटनेत मोरू गडकर वय वर्षे ४५ रा. पाठवाडी पोस्ट मळ्याण हे शेतलावणी करिता गेले असता उजव्या पायाच्या पंजाला कोणत्यातरी विशारी सरपंने दंश केल्याने त्यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक २९/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली असून, कागदपत्रांमध्ये मृत्यूचे कारण सर्पदंश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दोन्ही घटनांप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्याकडून आवश्यक पंचनामा, वैद्यकीय कागदपत्रे व इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, सर्पदंशाच्या घटनांमध्ये नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून, सर्पदंश झाल्यास वेळ न दवडता तातडीने वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *