छावा filmfare विशेष BEST ACTION HEROES OF रेवदंडा स्टंट नाही… ही तर रोजची जीवावरची ड्युटी
छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर | रेवदंडा दि. २२ मे २०२६
आपण शुक्रवारी “छावा”वर फिल्मफेअर स्पेशल देतो पण रेवदंड्यातील हे खरे हिरो कोणत्याही चित्रपटातील नाहीत. ना कॅमेरा… ना स्टंट डबल… तरीही रोज २५-३० फूट उंचीवर मृत्यूला समोर ठेवून काम करणारे हेच आपल्या गावातील खरे खतरों के खिलाडी. अभिराज पडवळ, निलेश परकर आणि प्रणित ठाकूर हे फक्त एमएसईबी कर्मचारी नाहीत…हे आहेत रेवदंड्याचे खरे नायक.कारण पडद्यावरचे हिरो फक्त अभिनय करतात…पण हे वीजयोद्धे रोज स्वतःचा जीव धोक्यात घालून गावाचा उजेड जिवंत ठेवतात. आपण फक्त म्हणतो लाईट गेली पण ती परत आणताना कुणाचातरी जीव टांगणीला लागलेला असतो.घरात पंखा बंद झाला… मोबाईल चार्जिंग थांबलं… टीव्ही बंद झाला की आपण लगेच बोलून जातो काय हे… परत लाईट गेली..पण त्या क्षणी गावाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात, २५-३० फूट उंच पोलावर एक तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून उभा असतो… फक्त आपलं घर पुन्हा उजळावं म्हणून..सध्या पावसाळ्यापूर्वी HT लाईन दुरुस्ती, ट्री कटिंग, डीपी मेंटेनन्स, वायर तपासणी अशी धोकादायक कामं सुरू आहेत. कारण उद्या वादळ, पाऊस, फॉल्ट झाला तरी गाव अंधारात राहू नये यासाठी हे वीजयोद्धे आजच लढत आहेत.कधी लाईनवर फॉल्ट…कधी व्होल्टेज कमी-जास्त… कधी डीपीमध्ये बिघाड…आणि त्या प्रत्येक वेळी हे कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत असतात.विशेष म्हणजे अनेक कॉन्ट्रॅक्टवरील लाईनमनना पुरेशी सुरक्षा देखील नसते…तरीही चेहऱ्यावर भीती नाही फक्त जबाबदारी असते. आज सलाम त्या तीन तरुणांना अभिराज पडवळ, निलेश परकर आणि प्रणित ठाकूर…जे रेवदंडा गावाचा उजेड कायम ठेवण्यासाठी रोज मृत्यूशी दोन हात करत आहेत हे फक्त कर्मचारी नाहीत… हे आहेत आपल्या गावाचे खरे वीजयोद्धे.आपण झोपेत असताना जागणारे…आपण अंधारात जाऊ नये म्हणून स्वतः धोक्यात जाणारे. सलाम तुमच्या धाडसाला… सलाम तुमच्या सेवेला… आणि सलाम त्या आई वडिलांना, ज्यांनी असे जिगरबाज मुलगे घडवले.दुर्दैव म्हणजे… आपण अनेकदा या वीजयोद्ध्यांकडे फक्त तक्रारीच्या नजरेने पाहतो.
पण खरं पाहिलं तर गावातील सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात धोकादायक काम हेच आहे… कडक ऊन असो, मुसळधार पाऊस असो किंवा वादळी वारा हे लाईनमन उंच पोलावर स्वतःचा जीव धोक्यात घालून लढत असतात. कारण त्यांना माहिती असतं आपलं काम थांबलं, तर हजारो घरांचा उजेड थांबेल.
![]()

