आम्हीच ते कॉकरोच देशभरात CJP चा स्फोट बॉलिवूड सेलिब्रिटीही उतरले मैदानात, तरुणांचा सोशल मीडिया बंड पुकारला

संपादकीय | छावा डिजिटल न्यूज पोर्टल, रायगड

देशात सध्या जर कोणत्या गोष्टीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असेल, तर ती म्हणजे “कॉकरोच जनता पार्टी” अर्थात CJP!

मीम्स, उपरोधिक पोस्ट्स, बेरोजगार तरुणांचा संताप आणि व्यवस्थेवरची खिल्ली… या सगळ्याचं मिश्रण असलेली ही डिजिटल चळवळ अवघ्या काही दिवसांत देशभर व्हायरल झाली आहे. इंस्टाग्रामवर या पेजने कोट्यवधी फॉलोअर्स मिळवल्याची चर्चा असून अनेक बड्या राजकीय पक्षांनाही मागे टाकल्याचं सांगितलं जात आहे.

संपूर्ण प्रकरणाची सुरुवात भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका कथित वक्तव्यामुळे झाली. सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला की बेरोजगार तरुणांचा उल्लेख “कॉकरोच” आणि “परजीवी” असा करण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर संताप उसळला आणि हजारो तरुणांनी “मी कॉकरोच आहे” अशा पोस्ट्स टाकत उपरोधिक आंदोलन सुरू केल.

या मोहिमेचा सूत्रधार अभिजित दिपके हा पुण्याचा तरुण असून सध्या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याने स्वतःला “कॉकरोच जनता पार्टी”चा संस्थापक अध्यक्ष घोषित केलं आहे.

दिया मिर्झा, फातिमा सना शेख, कोंकणा सेन शर्मा, उर्फी जावेद, ईशा गुप्ता, हिमांशी खुराना यांच्यासह अनुराग कश्यप, कुणाल कामरा, विशाल डडलानी आणि अनेक सेलिब्रिटींनी या ट्रेंडला सपोर्ट केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

या डिजिटल पक्षाने प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्रात बेरोजगारी, न्यायव्यवस्था, राजकीय नियुक्त्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर उपरोधिक शैलीत टीका करण्यात आली.

चिपकेंगे नही, बदलेंगे यही. अशी घोषणा देत आता “National Parasitic Front” नावाचा आणखी एक मीम-पक्ष मैदानात उतरला आहे.

 जनतेच्या पैशांवर पगार घेणाऱ्यांनी अशी भाषा योग्य आहे का?

देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्थेच्या खुर्चीवर बसणारी व्यक्ती ही फक्त न्याय देणारी नसते, तर ती संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या लाखो तरुणांची आशा असते. जनतेच्या कराच्या पैशातून पगार घेणाऱ्या जबाबदार पदावरील व्यक्तीकडून संयमी आणि सन्मानपूर्वक भाषा अपेक्षित असते. बेरोजगारीशी झुंजणाऱ्या तरुणांना जर “झुरळ” किंवा “परजीवी”सारख्या शब्दांत पाहिलं जात असेल, तर त्या संतापाला सोशल मीडियावर आवाज मिळणं स्वाभाविक मानलं जात आहे.

ती आता रील्स, मीम्स आणि इंस्टाग्राम पोस्टमधूनही पेटताना दिसत आहेत.

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *