चौलमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग ५४ वर्षीय संतोष मगर अटकेत
टीप: सदर प्रकरणातील पीडित मुलगी अल्पवयीन असून अद्याप शिक्षण घेत आहे; त्यामुळे तिचे नाव, पत्ता किंवा कोणतीही ओळख पटवणारी माहिती मुद्दामच प्रकाशित केलेली नाही. ही गोपनीयता Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act, 2012 च्या कलम 23 नुसार बंधनकारक आहे.
चौल परिसरात अल्पवयीन दहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संतोष गोविंद मगर (वय ५४, रा. चौल) याला रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल रेवदंडा प्रतिनिधी
रविवार, २१ सप्टेंबर २०२५
घटना २० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते १२:४५ या वेळेत चौल पाण्याच्या टाकीजवळ घडली. आरोपीने शाळेतून घरी परतणाऱ्या मुलीला ओळखीचा फायदा घेत घराजवळ बोलावले. त्यानंतर तिला मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून लाजिरवाणे वर्तन करत तिचा विनयभंग केला.
या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ११६/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७२(२), ७४, ७५(३) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) २०१२ मधील कलम ७, ८, ९(एम), १०, ११(३), १२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
![]()

