UP कन्नौज हादरलं! प्रोटीन शेक पिऊन 19 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू – जिम सील, FIR दाखल
फुप्फुसात प्रोटीन पावडरचे अंश सर्क्युलेशन बिघडल्यामुळे मृत्यूचा धक्कादायक संशय
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
✍️ PTI –उत्तर प्रदेश
📅 रविवार , २८ डिसेंबर २५
उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील तालग्राममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉडी बनवण्याच्या नादात 19 वर्षीय B.Sc. विद्यार्थ्याने जिममधील प्रोटीन शेक घेतल्यानंतर तब्येत बिघडून त्याचा मृत्यू झाला आहे. मुलाने फक्त 16 दिवसांपूर्वीच जिम जॉइन केले होते आणि लवकर शरीरयष्टी मिळावी यासाठी तो जिममधून मिळालेली प्रोटीन पावडर पिण्यास सुरुवात केली होती.
प्रोटीन शेक घेतल्यानंतर दोन दिवसांतच पोटात तीव्र वेदना, सतत उलट्या आणि तोंडाला सूज येऊ लागली. परिजनांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु प्रकृती बिघडत गेल्याने कानपूरला रेफर करण्यात आले. सलग 14 दिवस उपचार सुरू राहूनही अखेर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर कौटुंबिक सदस्यांनी जिमकडून गंभीर दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. पोलिसांकडे तक्रार झाल्यानंतर जिम सील करण्यात आले असून संचालकाविरुद्ध FIR दाखल करण्यात आली आहे. प्रकरणामुळे तालग्राम परिसरात खळबळ उडाली आहे.
डॉक्टरांच्या प्राथमिक माहितीनुसार, उलट्यांदरम्यान प्रोटीन पावडरचे काही कण फुफ्फुसात जाऊन रक्तपुरवठा बिघडल्याचा संशय आहे. नेमके कारण मेडिकल रिपोर्टनंतर स्पष्ट होणार आहे.
फिटनेसप्रेमींनी लक्षात ठेवा
मार्गदर्शनाशिवाय प्रोटीन सप्लिमेंट्स घेणे प्राणघातक ठरू शकते.
जिम प्रशिक्षक व डॉक्टर्सचा सल्ला आवश्यकच!
![]()

