‘या’ जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा, 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी..

महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई, रायगड आणि कोकण पट्ट्यात उन्हाच्या झळा वाढत असतानाच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
21 मार्च रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांत गारपिट होण्याची शक्यता आहे. विशेषतः यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये गारपिटसह वादळी वाऱ्यांचा सामना करावा लागू शकतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या भागांत 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.