JVM स्कूल मध्ये आजोबा-आजींसह ‘ग्रँड पॅरेंट्स डे’ आनंदात साजरा

साळाव : JVM स्कूल (Pre-Primary विभाग) मंगळवार, दि. ९ सप्टेंबर रोजी ‘ग्रँड पॅरेंट्स डे’ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस ७ सप्टेंबर रोजी रविवारी येत असल्यामुळे शाळेतर्फे तो मंगळवारी खास विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला.

साळाव — सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १४ सप्टेंबर २०२५

या कार्यक्रमात लहान मुलांनी आपल्या आजोबा-आजींसोबत खेळांचा आनंद घेतला. सुरुवातीला झालेल्या चेंडू झेलण्याच्या खेळात आजोबा-आजींनी फेकलेला चेंडू नातू किंवा नातीने डब्यात झेलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संगीत खुर्चीचा खेळ रंगला. कार्यक्रमात आणखी एक मजेशीर उपक्रम घेण्यात आला ज्यात पाच जोड्या समोरासमोर बसल्या. यात नवरा-बायको किंवा जोडीदार निवडून त्यांच्या आवडी-निवडी विचारण्यात आल्या. एखाद्या फळाशी तुलना करून त्यावरून बायकोचा किंवा पार्टनरचा स्वभाव सांगण्याचा हा खेळ अतिशय रंगतदार ठरला.

शाळेचे मुख्याध्यापक मुकेश ठाकूर यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले, आजी-आजोबांचे प्रेम आणि संस्कार ही प्रत्येक मुलासाठी अमूल्य देणगी आहे. अशा उपक्रमांतून नातवंडे व आजी-आजोबा यांचा स्नेहबंध अजून घट्ट होतो.

शाळेचे प्राचार्य मुकेश ठाकूर आणि उपप्राचार्य मंगेश बामनोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. Pre-Primary विभागातील शिक्षिका – सविता जॉय, जीना सेबॅस्टियन आणि अनन्या घरत यांनी संपूर्ण कार्यक्रमात मुलांना प्रोत्साहन दिले. तर अफीह बास्सा आणि मानसी जमकर यांनी सहकार्य केले व  विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या आजी-आजोबांना आनंददायी क्षणांचा अनुभव दिला.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *