सोन्याची चमक कमी होणार कधी? चांदी दिलासा देणार की नाही? काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 23 March 2025 : सोन्याने प्रति तोळा नव्वदीचा आकडा गाठला आहे. चांदीची एक लाखाच्या पुढे घोडदौड सुरू आहे. अशावेळी ही चमक कमी होणार की नाही, प्रश्न विचारला जात आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या.
सोने आणि चांदीने या आठवड्यात मोठी मुसंडी मारली. सोमवारी दोन्ही धातुत घसरण दिसली. त्यानंतर सलग तीन दिवस या धातुनी जबरदस्त फलंदाजी केली. गेल्या आठवड्यात सुद्धा किंमतीत मोठी वाढ झाली होती. अमेरिकन आक्रमक व्यापारी धोरणाचा परिणाम म्हणा अथवा इतर कारणं म्हणा दोन्ही धातुनी जानेवारी नंतर जी लांब उडी मारली. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या किंमती सातत्याने का वाढत आहे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…
सोन्याचा पुन्हा ब्रेक
या आठवड्यात सोमवारी 110 रुपये तर शुक्रवारी 440 रुपयांनी असे एकूण 550 रुपयांनी सोने स्वस्त झाले. तर मध्यला तीन दिवसात, मंगळवारी आणि बुधवारी प्रत्येकी 440 रुपयांनी दर वधारले. गुरूवारी 220 रुपये, अशी एकूण 1100 रुपयांची दरवाढ सोन्याने नोंदवली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 90,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.