जयोस्तुते हा राष्ट्रप्रेरणेचा मंत्र : दर्श नागोटकर यांचे प्रतिपादन
रेवदंडा (वार्ताहर/प्रतिनिधी) अखंड राष्ट्रासाठी जीवनाचा प्रत्येक क्षण समर्पिणारे, बहुआयामी व्यक्तित्वाचे धनी आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी आणि कार्याने आजही अनेक पिढ्यांना राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळत आहे आणि उद्याही मिळत राहणार आहे. जयोस्तुते हा फक्त शब्द नाही तर तो भारतमातेच्या स्वातंत्र्य कार्यातील आरंभलेल्या क्रांतीयज्ञाच्या समयीचा राष्ट्रप्रेरणेचा मंत्र आहे, जो आजही नवचेतना देतो, असे प्रतिपादन युवा सामाजिक कार्यकर्ते तथा…

