मॅनेजर आणि वसुलीवाला कुठे गायब? शेतकऱ्याच्या मृत्यूने फायनान्स कंपनीचे धाबे दणाणले १० हजारांच्या कर्जासाठी ७० हजारांची मागणी केल्याचा आरोप शेतकऱ्याचा मृत्यू, मॅनेजर व वसुलीवाला फरार

नांदेड | छावा डिजिटल न्यूज मीडिया ता.२५ ऑक्टोबर २०२६ – सचिन मयेकर 

मयत चंद्रकांत शिंदे
मयत चंद्रकांत शिंदे

नांदेडमध्ये एका शेतकऱ्याचा खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मृतदेह आढळतो, कुटुंबीयांकडून कर्जवसुलीच्या नावाखाली छळ केल्याचे गंभीर आरोप होतात आणि त्यानंतर कंपनीच्या मॅनेजर व वसुली करणाऱ्या व्यक्तीच्या फरारीचे होतात. हा केवळ एका शेतकऱ्याच्या मृत्यूचा प्रश्न नाही; हा कर्जवसुलीच्या पद्धतीवर आणि सामान्य माणसाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा गंभीर प्रकार आहे.

मॅनेजर आणि वसुलीवाला फरार आहें पण नेमके कुठे आहेत?

चंद्रकांत शिंदे या ४० वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह नांदेडमधील फायनान्स कंपनीच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, १० हजार रुपयांच्या कर्जापोटी ७० हजार रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप आहे. शेतकऱ्याला गावातून कार्यालयात नेण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

 

या घटनेनंतर कंपनीच्या मॅनेजर आणि वसुली करणाऱ्या व्यक्तीच्या फरार झालेले आहेत. मात्र ते कुठे फरार झालेत त्या बाबात अद्याप माहिती मिळालेली नाही.

प्रश्न सरळ आहे — शेतकऱ्याचा मृत्यू झाला, कुटुंबीय न्यायासाठी आक्रोश करत आहेत; मग या प्रकरणातील प्रत्येक संबंधित व्यक्तीची जबाबदारी निश्चित होणार कधी?

 १० हजारांचे कर्ज की ७० हजारांचा वसुलीचा दबाव?

दहा हजार रुपयांच्या कर्जासाठी सत्तर हजार रुपयांची मागणी झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे. ही मागणी नेमकी कोणत्या आधारावर करण्यात आली? व्याजाची गणना कशी झाली? वसुलीसाठी कोणत्या पद्धतींचा वापर करण्यात आला? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर आली पाहिजेत.

कर्ज घेतले म्हणजे कर्जदाराचे कायदेशीर हक्क संपत नाहीत. कर्जवसुलीच्या नावाखाली धमकी, बळजबरी किंवा बेकायदेशीर डांबून ठेवण्याचा प्रकार घडला असेल, तर तो गंभीर कायदेशीर प्रश्न ठरतो. मात्र, या प्रकरणात नेमके काय घडले, हे पुरावे आणि तपासातून सिद्ध झाले पाहिजे.

 खून आणि अपहरणाचा गुन्हा तपासाकडे राज्याचे लक्ष

या प्रकरणात फायनान्स कंपनीच्या मालकासह संबंधित व्यक्तींविरुद्ध खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल झाले आहें. एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहितीही प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक आरोपीची भूमिका, घटनास्थळावरील परिस्थिती आणि मृत्यूचे नेमके कारण यांचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.

 छावा परखड सवाल

 शेतकऱ्याच्या मृत्यूमागील संपूर्ण सत्य कधी समोर येणार? कर्जवसुलीच्या नावाखाली नेमके काय घडले, याचा तपास कधी पूर्ण होणार?  फरारी असल्याचे वृत्त असलेल्या संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची चौकशी कधी होणार? मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला न्याय आणि दोषींना कायद्यानुसार शिक्षा कधी मिळणार?

छावा मत : एखादा गरीब शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असेल, तर त्याला कायदेशीर मार्गाने न्याय मिळाला पाहिजे; त्याच्यावर अन्याय होत असेल, तर प्रशासनाने ठोस कारवाई केली पाहिजे. चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूचे सत्य कोणत्याही दबावाशिवाय बाहेर आलेच पाहिजे. फरारीच्या वृत्ताची अधिकृत पडताळणी करून संबंधितांना कायद्याच्या कक्षेत आणण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. दोष सिद्ध झाल्यास कोणालाही पाठीशी घालता कामा नये. हा प्रश्न केवळ एका शेतकऱ्याचा नाही; कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या प्रत्येक सामान्य माणसाच्या न्यायाचा आहे.

छावा डिजिटल न्यूज मीडिया –  जनतेचा आवाज, अन्यायाविरुद्ध प्रहार…

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *