अलिबागेत सिद्धू धमाका श्रीराम फायनान्सला मनसेचा दणका
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर दि. 30 मे २०२६
कर्जवसुलीच्या नावाखाली सर्वसामान्यांवर दबाव टाकण्याच्या तक्रारी वाढत असल्याची चर्चा असून, अशा प्रकारांना वेळीच लगाम घालण्यासाठी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांची चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
श्रीराम फायनान्सच्या वसुली पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नियमित तब्बल 42 हप्ते भरलेल्या एका मराठी युवकाला कथितरित्या धमकावून पैसे उकळल्याचा आरोप होत असून, या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूषण पाटील यांनी स्विफ्ट कारसाठी कर्ज घेतले होते. त्यांनी बहुतांश हप्ते वेळेवर भरले होते. मात्र आजारपणामुळे शेवटचे काही हप्ते भरण्यास उशीर झाला. याबाबत त्यांनी कंपनीला वैद्यकीय कागदपत्रे व ई-मेलद्वारे माहिती देत काही दिवसांची मुदत मागितल्याचे सांगितले जाते. तरीदेखील, कंपनीच्या वतीने आलेल्या काही व्यक्तींनी अंधेरी परिसरात त्यांची गाडी अडवून शिवीगाळ, मारहाणीची धमकी दिली व ₹7 हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच मनसेने संतप्त प्रतिक्रिया देत इशारा दिला आहे की, “मराठी माणसावर अन्याय, दमदाटी किंवा गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकारांना मनसे जशास तसे उत्तर देईल.या प्रकरणामुळे फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. हप्ते थकले म्हणून धमक्या? मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न? या प्रश्नांची उत्तरे आता संबंधित यंत्रणांना द्यावी लागणार आहेत.
![]()

