सुधारक” पुरुष सन्मान पुरस्कार सोहळ्यात निलेश गाडे यांचा पत्नीसमवेत गौरव

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ सचिन मयेकर , अलिबाग 📅 मंगळवार | २४ फेब्रुवारी २०२६

अलिबाग : नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या “सुधारक” पुरुष सन्मान पुरस्कार सोहळ्यात निलेश गाडे यांचा पत्नीसमवेत सन्मान करण्यात आला.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पाठबळ देणारे, कुटुंब आणि समाजात सकारात्मक बदल घडवणारे तसेच ग्रामीण महिला उद्यमशीलतेस प्रोत्साहन देणारे कार्य लक्षात घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, महिला बचतगट सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला नायब तहसीदार श्री. संदिप जाधव, अलिबाग पोलिस निरीक्षक श्री. साळे साहेब.उपस्थित होते.

पत्नीसमवेत झालेल्या या सन्मानामुळे स्त्री-पुरुष समानतेचा आणि परस्पर सहकार्याचा सुंदर संदेश समाजात पोहोचला.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *