ढाका मुक्तीचे नायक : मेजर जनरल हरदेवसिंग कलेर (MVC) (‘बॉर्डर 2’ मधील फतेहसिंग कलेर पात्रामागची खरी शौर्यगाथा)

  1. छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  2. ✍️ सचिन मयेकर
  3. 📅 मंगळवार , २७ जानेवारी २६

1971 च्या भारत–पाकिस्तान युद्धात मेजर जनरल हरदेवसिंग कलेर यांनी बजावलेली भूमिका इतकी निर्णायक होती की इतिहासाने त्यांना “Liberator of Dhaka” — ढाका मुक्तीचे नायक म्हणून गौरवले. रणांगणावर दाखवलेले असामान्य नेतृत्व, प्रत्यक्ष शौर्य आणि सैनिकांसाठी प्रेरणादायी उदाहरण यासाठी त्यांना भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च युद्धपराक्रम सन्मान — महावीर चक्र (Maha Vir Chakra – MVC) प्रदान करण्यात आला.

सेनादलातील सेवाकालात त्यांनी पुढे मेजर जनरल पदापर्यंत मजल मारली आणि निवृत्तीपर्यंत अत्यंत सन्मानाने सेवा बजावली. निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या युद्धानुभवांवर आधारित आत्मचरित्र ‘12 Days to Dacca’ लिहिले—1971 च्या मोहिमेचे थेट, प्रामाणिक आणि प्रभावी वर्णन. हे पुस्तक 2016 साली कोलकाता येथे भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) शंकर रॉयचौधरी यांच्या हस्ते प्रकाशित झाले. त्या वेळी त्यांचे पुत्र, विंग कमांडर DJS “डिजे” कलेर (स्वतःही शौर्यपदकाचे मानकरी) यांनी वडिलांच्या सत्यनिष्ठा, कर्तव्यभावना आणि सन्मानप्रिय सेवेबद्दल भावूक शब्दांत मनोगत व्यक्त केले.

1971 च्या युद्धात माईन स्फोटात झालेल्या जखमा त्यांना आयुष्यभर सोडून गेल्या नाहीत. वयाच्या नव्वदीत त्या जुन्या जखमांच्या गुंतागुंतीमुळे त्यांचा डावा पाय कापावा लागला—ही देशसेवेच्या किंमतीची वेदनादायी आठवण ठरली. 27 मे 2016 रोजी, अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील वॉलनट येथे त्यांच्या निवासस्थानी त्यांचे निधन झाले.

मेजर जनरल हरदेवसिंग कलेर यांचे आयुष्य म्हणजे भारतीय सैन्याच्या सर्वोत्तम परंपरांचे प्रतीक—रणांगणातील धैर्य, नेतृत्वातील स्पष्टता, आदेशात प्रामाणिकपणा आणि विजयातही मानवता. 1971 च्या युद्धातील त्यांच्या निर्णायक भूमिकेमुळे बांगलादेश मुक्तीला गती मिळाली आणि पाकिस्तानी सैन्याचा जलद पराभव झाला. ते केवळ पदकविजेते योद्धे नव्हते, तर समोरून नेतृत्व करणारे, सैनिकांना कृतीतून प्रेरणा देणारे आणि युद्धात व शांततेतही सेनेचा सन्मान जपणारे सेनापती म्हणून अजरामर झाले.

 

पाकड्यांची औकात  बॉर्डर 2 चव्हाट्यावर आणली 

“बॉर्डर 2” हा सिनेमा केवळ युद्ध दाखवत नाही, तर तो भारत काय आहे आणि भारताला डिवचणाऱ्यांची औकात काय आहे हे ठामपणे मांडतो. हा चित्रपट पाहताना प्रेक्षक फक्त मनोरंजन घेत नाही, तर तो मनाने सीमारेषेवर उभा राहतो. इथे देशभक्ती म्हणजे घोषणा नाही, तर ती शिस्त, संयम आणि गरज पडल्यास निर्णायक प्रहार आहे.

चित्रपटाची प्रत्येक फ्रेम एक गोष्ट अधोरेखित करते— भारत शांत आहे, पण कमजोर नाही. आणि भारताला डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकड्यांचे सर्व डाव शेवटी धुळीस मिळतात.

पाकड्यांची औकात : आक्रमक वास्तव

“बॉर्डर 2” मध्ये भारताला अस्थिर करण्याचे, कुरघोड्या करण्याचे आणि डिवचण्याचे पाकड्यांचे सर्व प्रयत्न एकामागोमाग एक अपयशी ठरताना स्पष्ट दिसतात. रणांगणावरच नव्हे, तर धोरणात्मक आणि मानसिक पातळीवरही टोणग्यांचे हस्तक किती कुचकामी आहेत, हे चित्रपट ठसवतो. आरडाओरड, धमक्या आणि कारस्थाने हीच ज्यांची तथाकथित ताकद—ती भारताच्या संयम, शिस्त आणि लष्करी क्षमतेसमोर निष्प्रभ ठरते.औकात काय असते, हे शिवीगाळ न करता कृतीतून दाखवण्याचं काम “बॉर्डर 2” करतो.इथे थिएटरमध्ये शिट्ट्या–टाळ्यांचा पाऊस पाडणारी ओळ येते—“भारतात ईदला जेवढे बोकड कापले जातात, तेवढी माणसंही पाकिस्तानात नाहीत!”ही ओळ केवळ टोला नाही; ती खोट्या माजावरचा थेट प्रहार आहे.

सनी देओल : पडद्यावरचा ज्वालामुखी

सनी देओल म्हणजे या चित्रपटाचा कणा. त्याचा आवाज, नजर आणि संवाद म्हणजे शत्रूच्या छातीत घुसलेला आत्मविश्वास. पाकिस्तानच्या मेजरला सुनावलेले संवाद टाळ्यांसाठी नाहीत, तर भारताच्या ठाम भूमिकेचा हुंकार आहेत. शिट्ट्या का पडतात, याचं उत्तर प्रत्येक सीनमध्ये मिळतं.

आई, सैनिक आणि देश

“देश कोणताही असो, प्रत्येक सैनिक आईचा आशीर्वाद घेऊनच युद्धात उतरतो”ममताचा हा संवाद युद्धामागचं खरं वास्तव सांगतो. सीमेवर उभा असलेला सैनिक जितका मजबूत, तितकीच मजबूत त्याच्या पाठीशी उभी असलेली आई.

दिग्दर्शन : ग्लॅमर नाही, गांभीर्य

फाजील गाणी, प्रेमकथा नाहीत—आहे फक्त कर्तव्य. रणांगणातील धावपळ, गोळ्यांचा आवाज, धुराने भरलेली हवा आणि चेहऱ्यांवरील थकवा—सगळं वास्तवाच्या अगदी जवळ. प्रेक्षक मानसिकरित्या युद्धाचा भाग बनतो.

संवाद : शब्द नव्हे, शस्त्र

संवाद गोड बोलण्यासाठी नाहीत; ते प्रहारासाठी आहेत. त्यामुळेच अंगावर काटा येतो.

देशभक्तीचा खरा अर्थ पोस्ट, स्टेटस, घोषणा नव्हे शांतपणे, न बोलता, सीमेवर उभं राहणं म्हणजे देशभक्ती.

“बॉर्डर 2” पाहून बाहेर पडताना छाती अभिमानाने फुलते.

आपण सुरक्षित आहोत, कारण कोणी तरी सीमेवर जागा आहे.

भारत संयमी आहे—पण कधीही दुर्बल नाही.

उत्तर मिळतं ते भारताच्या ताकaदीतून.

👉 “बॉर्डर 2” पाहणं नाही, अनुभवणं आहे.

👉 प्रत्येक भारतीयाने थिएटरमध्ये जाऊन पाहायलाच हवा असा सिनेमा.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *