मकरसंक्रांतीनंतर रेवदंडा समुद्रकिनारी आनंदाची उधळण; आकाशात पतंग, मनात उत्सव..
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 रविवार , १८ जानेवारी २६
मकरसंक्रांती झाल्यानंतर रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा उत्साह, आनंद आणि रंगांची उधळण पाहायला मिळत आहे कारण ग्रामस्थांनी आकाशात सोडलेले रंगीबेरंगी पतंग किनाऱ्यावरील निळ्याशार आकाशात मुक्तपणे झुलताना दिसत आहेत आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत समुद्राच्या वाऱ्यासोबत पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लोक घेत आहेत, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण कुटुंबासह किनाऱ्यावर जमा होत असून पतंग उडवणे हा स्पर्धेचा नाही तर निव्वळ आनंदाचा आणि परंपरेचा उत्सव म्हणून साजरा केला जात आहे, यावेळी कुठलाही कटिंगचा प्रकार किंवा धारदार मांज्याचा वापर न करता सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीनेच पतंग उडवले जात आहेत, त्यामुळे वातावरणात कोणतीही भीती नसून केवळ हसू, गप्पा, टाळ्यांचा कडकडाट आणि आनंदी जल्लोष दिसून येतो, समुद्रकिनाऱ्याला लाभलेल्या मोकळ्या जागेमुळे आणि सतत वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे पतंग उडवण्याचा अनुभव अधिकच सुखद होत आहे, अनेकजण पारंपरिक कागदी पतंग उडवत आहेत तर काहीजण विविध रंगांचे आणि वेगवेगळ्या आकारांचे पतंग आकाशात सोडत आहेत, कुटुंबीय एकत्र बसून गप्पा मारत पतंग पाहत आहेत तर मुले आकाशाकडे डोळे लावून आनंदाने धावपळ करत आहेत, या सगळ्या वातावरणात मकरसंक्रांतीनंतरचा हा काळ रेवदंड्यासाठी एक प्रकारचा छोटेखानी उत्सवच ठरत आहे, परंपरा जपताना सुरक्षिततेलाही तेवढेच महत्त्व दिले जात असल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत, एकूणच रेवदंडा समुद्रकिनारा सध्या आनंद, शांतता आणि सामूहिक उत्साहाने न्हाऊन निघालेला दिसत असून पतंगांच्या या रंगीबेरंगी खेळामुळे गावात सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
![]()

