स्वतःचीच माणसं विरोधात… तरीही सर्वांवर मात करून पुढे गेलेला राजा – संभाजी
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 शुक्रवार , १६ जानेवारी २६
आज प्रत्यक्ष राज्याभिषेक नाही पण आज त्या इतिहासाची आठवण आहे ज्या इतिहासात सत्ता सहज मिळाली नाही तर संघर्षातून हिसकावली गेली आज तो दिवस आठवला जातो ज्या दिवशी स्वतःचीच माणसं विरोधात असतानाही एक राजा ताठ मानेने पुढे गेला बाहेर मुघलांचा दबाव होता आत दरबारात कुजबुज होती नातलगांचे कट होते स्वराज्याला आतून पोखरण्याचे प्रयत्न सुरू होते आणि या सगळ्यांच्या मध्यात छत्रपती संभाजी महाराज उभे होते एकटे पण ठाम कारण शत्रू बाहेर असेल तर तलवारीने उत्तर देता येतं पण शत्रू स्वतःचा असेल तर मनगटात जास्त ताकद लागते स्वराज्यातच काही चेहरे गादीकडे डोळा लावून बसले होते काहींना राजा कठोर वाटत होता काहींना राजा धोकादायक वाटत होता तर काहींना स्वतःची सत्ता जात असल्याची भीती होती म्हणून संशय पसरवले गेले नात्यांचा वापर दबावासाठी झाला विश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न झाला आणि राज्याभिषेकच होऊ नये यासाठी आतून हालचाली झाल्या पण संभाजी महाराज न झुकले न डगमगले न तडजोडीला बसले कारण हा प्रश्न सत्तेचा नव्हता हा प्रश्न स्वराज्याच्या अस्तित्वाचा होता बाहेर औरंगजेबाचा डाव मांडलेला होता लष्करी दबाव वाढवलेला होता आणि आतून फूट पाडण्याचा प्रयत्न चालू होता तरीही हा राजा मागे हटला नाही कारण त्याने आधीच रणांगण पाहिलं होतं जखमा अनुभवल्या होत्या उपासमार सहन केली होती आणि विश्वासघात ओळखायला शिकले होते म्हणून जेव्हा स्वतःचीच माणसं विरोधात उभी राहिली तेव्हा तो अधिक कडक झाला अधिक ठाम झाला अधिक धगधगता झाला आज आपण जो इतिहास आठवतो तो फक्त मुघलांविरुद्ध लढणाऱ्या राजाचा नाही तर तो इतिहास आहे स्वतःच्या माणसांच्या विरोधावर मात करून पुढे गेलेल्या राजाचा आज विधी नाहीत पण आज धैर्य जिवंत आहे आज सोहळा नाही पण आज ठामपणा उभा आहे आणि म्हणूनच संभाजी महाराजांचा इतिहास आजही अस्वस्थ करतो कारण हा इतिहास झुकणाऱ्यांचा नाही तर सर्वांच्या विरोधात उभा राहणाऱ्यांचा आहे 🚩
![]()

